पेट्रोल दरवाढीमुळे वाहनचालकांना त्रास
बीड : पेट्रोल व डिझेलचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. पेट्रोल, डिझेलच्या भाववाढीमुळे सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले असून पेट्रोल-डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशी मागणी नागरिक, वाहनधारकांमधून होत आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे महागाईत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, याचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनमानावर होत आहे.
जनजागृती मोहिमेची आवश्यकता
बीड : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे व नागरिकांनी दक्षता बाळगावी यासाठी आरोग्य प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने जनजागृती मोहीम सुरू आहे. मास्कचा वापर करण्याबद्दल सक्ती केली जात आहे. शहरवासीयांनी बाजारात मास्क खरेदीसाठी सुरुवात केली आहे. ग्राहकांची मास्क खरेदीसाठी असलेली मोठी पसंदी यामुळे बाजारात फॅन्सी मास्क मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आले आहेत. अनेक दुकानदार मास्क चढ्या भावाने विकत आहेत.