सुरळीत पाणी पुरवठ्याची मागणी
बीड : नगरपरिषदेकडून शहराला करण्यात येणारा पाणीपुरवठा अनियमितपणाने करण्यात येत आहे. शहराच्या काही भागात तीन दिवसाआड आणि तेही सात ते आठ तास तर काही भागात बारा ते पंधरा दिवसाआड आणि तेही फक्त दीड ते दोन तास याप्रमाणे पाणीपुरवठा होतो. शहरातील एकूण एक प्रभागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मास्कची चढ्या भावाने विक्री
अंबाजोगाई : शहरातील औषधी दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखवला जातो ; अन्यथा ते चढ्या भावाने विकले जातात. तसेच दोन पदरी आणि तीन पदरी मास्कच्या किमती ही दुपटीपेक्षा अधिक दराने विक्री केली जाते. याचा मोठा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तर मास्कसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. यामुळे सामान्य ग्राहकांची लुबाडणूक होत आहे.