शिवाजी धांडे नगरातील स्थिती: भूमिगत नाली, पथदिव्यांचे कामही रखडले
बीड: शहरातील शिवाजी धांडे नगरात ऐन सणासुदीत नागरिकांना कसरत करावी लागत आहे. मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने रहिवाशांना त्रास सोसावा लागत आहे. रस्ते खचल्याने अपघाताची भीती असून वाहनेदेखील फसण्याची शक्यता आहे.
शहरातील शिवाजी धांडे नगर ही नवीन रहिवासी वसाहत आहे. या भागात शंभर मीटर रस्ते आहेत. मात्र, ते पक्के नसल्याने पावसाचे पाणी साचून खचू लागले आहेत. त्यामुळे स्थानिकांना कसरत करावी लागत आहे. दुचाकीच्या टायरला चिखल लागत असल्याने घसरून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पथदिवे नाहीत, शिवाय भूमिगत नालीचे कामही रखडलेले आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप स्थानिकांनी केला.
....
...तर पालिकेसमोर आंदोलन
दरम्यान, शिवाजी धांडे नगर भागातील नागरी सुविधांबाबत पालिका प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास पालिका कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनविसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. शैलेश जाधव यांनी दिला. वारंवार निवेदने देऊनही टाळाटाळ केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
090921\252809bed_15_09092021_14.jpg
खराब रस्ता