बीड : दूध दरात दरवाढ करावी, या मागणीसाठी आज सकाळी तालुक्यातील जरूड येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.
या आंदोलनात सुधीर काकडे, बाजार समिती संचालक धनंजय गुंदेकर, सरपंच राजेंद्र राऊत, सरपंच गणेश जगताप, सरपंच दिनकर शेळके, सरपंच, सोलनकर, माजी सरपंच बोरगे, सरपंच ज्ञानेश्वर जोगदंड, चेयरमन मनोज वाघमारे, सुदर्शन कुटे, मोहन तंबरे, शंकर लचके, भागवत वाघमारे, विनायक लाड, अविनाश वाघमारे, अशोक राऊत, गजानन वाघमारे, अतुल पवार, मोहन राऊत, मधुकर तंबरे, चेअरमन गणेश राऊत, श्रीपत बापू काळे, विलास काकडे, रामेश्वर काळे, सचिन बजगुडे, सतीश साळुंके, रमेश शेळके, सुरेश खडके, अशोक बजगुडे आदींचा सहभाग होता.
या आहेत मागण्याआंदोलनात दुधाला ५० रूपये हमी भाव मिळावा, पशु खाद्याच्या किंमती ५० टक्क्यांपेक्षा कमी कराव्यात, पशु औषधे जीएसटी मुक्त करावे, प्रत्येक गावात आद्ययावत पशु वैद्यकीय प्रयोगशाळा व पशु वैद्यकीय दावाखाना असावा आदी मागण्या करण्यात आल्या.