शहरातील आंबेडकर चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी असतानाच पोलीस निरीक्षक सलीम चाऊस, सरपंच अनिल ढोबळे, ग्रामसेवक आबासाहेब खिल्लारे यांच्यासह पोलीस फौजफाट्यासह दंगल नियंत्रक पथकासह दाखल झाले. पथकाला पाहताच रस्त्यावर फिरणारांची धांदल उडाली. दुकानांचे अर्धे शटर उघडे ठेवणाऱ्याची चांगलीच पंचायत झाली. काही वेळात कडा येथील रस्ते निर्मनुष्य झाले. कडा येथे मोठी बाजारपेठ असल्याने कडा परिसरातील दहा ते बारा गावातील नागरिकांची विविध कामासंदर्भात वर्दळ असते. लॉकडाऊन असूनही कडा येथे अनेक जण रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. विनाकारण गर्दी करू नका, तोंडाला मास्क बांधा, सामाजिक अंतर ठेवा, विनाकारण घराबाहेर फिरू नका, असे आवाहन पोलीस प्रशासन तथा ग्रामपंचायतर्फे नागरिकांना करण्यात येते. तरीही काही नागरिक या आवाहनाला प्रतिसाद देत नसल्याने शुक्रवारी पोलीस व दंगल नियंत्रक पथक कड्यात येताच येथील रस्ते निर्मनुष्य होऊन सर्वत्र स्मशान शांतता दिसत होती.
पोलिसांनी पथसंचलन करताच रस्ते निर्मनुष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 4:33 AM