शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
4
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
5
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
6
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
7
टेबल फॅन खूपच खराब झालाय... स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' सोपी पद्धत, चमकेल नव्यासारखा
8
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
9
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
10
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
11
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
12
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
13
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
14
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
15
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
16
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
17
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
18
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
19
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
20
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी

गरिबांच्या खिशावर दरोडा! २६० अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाचखोरीतून कमावली करोडोंची मालमत्ता

By सोमनाथ खताळ | Updated: February 17, 2025 12:21 IST

भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यांची उघड चौकशी केल्यानंतर सर्व गोळाबेरीज केली जाते.

बीड : गलेलठ्ठ पगार असतानाही प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी गरिबांच्या खिशावर दरोडा टाकत आहेत. याच लाचखोरीच्या पैशांतून ११ वर्षांत २६० जणांनी करोडो रुपयांची मालमत्ता जमा केली आहे. कायदे कडक केले जात असले तरी भ्रष्टाचार काही केल्या थांबत नसल्याचे समोर आले आहे.

रिक्षाचालकाकडून ३०० रुपयांचा हप्ता घेण्यापासून ते लाखो, करोडाे रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी आतापर्यंत राज्यात अनेक बडे मासे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या गळाला लागले आहेत. नियमांत आणि फुकटात होणाऱ्या कामांसाठीही अधिकारी, कर्मचारी सामान्यांकडून लाच घेत आहेत. काही समजदार लोक याची तक्रार करतात. त्यामुळेच हे भ्रष्ट अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकत आहेत. त्यांची उघड चौकशी केल्यानंतर सर्व गोळाबेरीज केली जाते. जास्त संपदा आढळल्यानंतर अपसंपदेचा गुन्हा दाखल केला जातो.

२०२५ मध्ये १३२ मासे गळालाजानेवारी व १३ फेब्रुवारीपर्यंत राज्यात ९३ कारवाया झाल्या. यात १३२ मासे गळाला लागले आहेत. पैकी वर्ग १ चे ९, वर्ग २ चे १६ यांचा समावेश आहे. यामध्ये २८ लाख ४० हजार ४९५ रुपये लाच रक्कम जप्त केली आहे. कारवायांमध्ये महसूल, भूमी अभिलेख व नोंदणी अव्वल असून पोलिस दुसऱ्या क्रमांकावर आहेत.

२०२४ मध्ये ३ कोटी जप्त२०२४ या वर्षात एसीबीने राज्यभरात ६९३ कारवाया करून १ हजार २ आरोपींना पकडले. त्यांच्याकडून ३ कोटी १८ लाख २४ हजार ४१० रुपयांची लाच रक्कम जप्त केली. यामध्ये केवळ वर्ग १ च्या ६२ अधिकाऱ्यांकडून ५८ लाख २६ हजार रुपये जप्त केले होते.

अपसंपदा म्हणजे काय?एखादा लोकसेवक लाच घेताना पकडला जातो. त्यानंतर त्याची परवानगी घेऊन उघड चौकशी केली जाते. यात वेतन, व्यवसाय यांसह इतर सर्वांची मालमत्ता व रोख रक्कम यांची गोळाबेरीज केली जाते. उत्पन्न व खर्च जाऊन उरलेली रक्कम ही अपसंपदा म्हणून गृहीत धरली जाते.

अपसंपदेचा गुन्हालाचेची कारवाई झाल्यानंतर उघड चौकशी केली जाते. त्यात उत्पन्न व खर्च यांचा हिशोब जुळला नाही तर अपसंपदेचा गुन्हा दाखल केला जातो.- शंकर शिंदे, उपअधीक्षक, एसीबी, बीड

अशी आहे आकडेवारीगुन्ह्याचा प्रकार - २०१४ - २०१५ - २०१६ - २०१७ - २०१८ - २०१९ - २०२० - २०२१ - २०२२ - २०२३ - २०२४सापळा - १२४५ - १२३४ - ९८५ - ८७५ - ८९१ - ८६६ - ६३० - ७६४ - ७२८ - ७९५ - ६८३अपसंपदा - ४८ - ३५ - १७ - २२ - २२ - २० - १२ - ७ - १२ - १२ - ३१

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागBeedबीडCrime Newsगुन्हेगारीRevenue Departmentमहसूल विभाग