शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
2
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
3
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
5
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
6
Lawrence Bishnoi : "लॉरेन्स बिश्नोई रोज सकाळी १०८ वेळा..."; वकिलाने सांगितल्या गँगस्टरच्या काही खास गोष्टी
7
"पक्षापेक्षा जास्त उमेदवाराचा विचार!" मनवा नाईकने केलं मतदान, म्हणाली, "स्थिर सरकार..."
8
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणुकीदिवशीच सोलापुरात ठाकरे गटाला धक्का! सुशीलकुमार शिंदेंचा अपक्ष उमेदवाराला पाठिंबा
10
६ महिन्यांत 'या' शेअरमध्ये ५६५% ची वाढ; आता बोनस शेअर देण्याची तयारी, कोणता आहे स्टॉक?
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
12
Vidhan Sabha 2024: महिला उमेदवारांचे त्रिशतक; आतापर्यंतचा उच्चांक!  
13
RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा डीपफेक व्हिडीओ व्हायरल; रिझर्व्ह बँकेनं नागरिकांना केलं सावध, म्हणाले...
14
शिंदेंच्या शिवसेनेकडून बनावट पत्र, राज ठाकरे संतापले; "वरळीकर मतदार सूज्ञ..." 
15
चंदा कोचर यांच्याविरोधात कारवाई करू नका, उच्च न्यायालयाचे एसएफआयओला निर्देश 
16
Sharad Pawar: सुप्रिया सुळेंवर मतदानाच्या आदल्या दिवशी गंभीर आरोप; शरद पवारांनी एका वाक्यात विषय संपवला!
17
विधानसभा निवडणुकीत 'आप' कोणाला तिकीट देणार? अरविंद केजरीवालांकडून मोठा खुलासा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : राज्यात अनेक ठिकाणी 'ईव्हीएम' पडले बंद, मतदारांचा खोळंबा, केंद्राबाहेर गर्दी
19
Jio New Recharge: केवळ इतक्या रुपयांमध्ये मिळणार वर्षभरासाठी अनलिमिटेड 5G डेटा; पाहा डिटेल्स
20
सदा सरवणकरांच्या कोटवर दिसला उलटा 'धनुष्यबाण'; मनसेच्या अमित ठाकरेंनी केला सरळ

‘रोहयो’ची कामे ठप्प; काम देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 5:46 AM

काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० किलोमीटर रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली ...

काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास

राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० किलोमीटर रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान व झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. ही झुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांनी केली आहे. परंतु, अद्यापही याकडे लक्ष न दिल्याने वाहनधारकांना त्रास सुरूच आहे.

मास्क वापरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मास्कच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. अजूनही कोरोनासदृश्य स्थिती असतानाही नागरिक विनामास्क बिनधास्त वागत आहेत. नागरिकांनी सक्तीने मास्कचा वापर करावा व दक्षता बाळगावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ. राहुल धाकडे यांनी केले आहे. मास्क हीच खरी कोरोनावरील लस आहे, असेही ते म्हणाले.

हातगाडे रस्त्यावर; वाहतुकीला त्रास

अंबाजोगाई : शहरात शिवाजी चौक, सावरकर चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यावर सातत्याने हातगाडे रस्त्यावर लावण्यात येत असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. यासंदर्भात नगर परिषद प्रशासनाने हातगाडे रस्त्याच्या बाजूला न लावता पाठीमागे सरकून लावण्याबाबत कारवाई करावी व रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.

पर्यावरण धोक्यात

अंबाजोगाई : शहरात व परिसरात अनेक वीटभट्ट्या आहेत. रितसर परवानगी नसतानाही भट्ट्या सुरू आहेत. या वीटभट्ट्या प्रदूषण करत आहेत. प्रदूषण करणाऱ्या या वीटभट्ट्यांवर कारवाईची मागणी होत आहे.