बीड : शहरातील औद्योगिक वसाहतीमधील एका गोदाममाध्ये बनावट कीटकनाशके बनवण्याचे काम सुरु होते. याची माहिती गुप्त वार्ता कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक व तालुका कृषी अधिकारी यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून औद्योगिक वसाहतीमधील गोदामावर बुधवारी रात्री उशिरा छापा मारला. यावेळी १९ लाख रुपयांचा बनावट माल जप्त करण्यात आला आहे. तसेच पेठ बीड पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शेती करत असताना विविध पिकांवर कीड व रोगांचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी नैसर्गिकरित्या तयार केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांनी वळावे यासाठी शासनाकडून देखील जनजागृती केली जात आहे. हीच गोष्ट लक्षात घेऊन बनावट कंपनीच्या नावे कुठलाही परवाना नसताना निंबुळी अर्क, कीटकनाशके तयार करुन ती बाजारात विक्री केली जात होती. या कीटकनाशकांच्या किंमती देखील शेतकऱ्यांना परवडणा-या नव्हत्या.यासंदर्भात कृषी विभागाकडे माहिती मिळालानंतर बुधवारी रात्री उशिरा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, गुणनियंत्रण निरीक्षक संतोष गाडे, सिरसठ, सुहास जोगदंड यांनी शहरालगच्या रामतीर्थ नाक्याजवळील या अवैध कारखान्यावर धाड टाकली. यावेळी रात्री उशिरा १० वाजता गोदामाची दारे उघडण्यास सांगितले. दार उघडल्यानंतर ‘इथे काय सुरु आहे असे विचारले’ असता विविध प्रकारची नैसर्गिक कीटकनाशके तयार केली जातात व ती डिलरच्या माध्यमातून शेतकºयांना विक्री केली जातात असे सांगण्यात आले. यासंदर्भात परवाना व इतर कागदपत्रांची तपासणी व काखान्याची झाडाझडती घेतील असता सर्व प्रकार गैर असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाºयांच्या लक्षात आले. त्यानंतर सर्व मालाची तपासणी करण्यात आली व बनावट माल कृषी विभागाने जप्त करुन त्याचाा पंचनामा केला.यावेळी ज्ञानेश्वर शिवाजी राख (रा. होळ ता. केज), कामगार नंदलाल बाळासाहेब शिंदे, शिवाजी मच्छिंद्र मुळे (रा. वाढवाणा ता.जि. बीड) यांना अटक करण्यात आली. आणखी कोणी मालक आहे का असे विचारल्यानंतर नितीन बबन मुळे याचे नाव पुढे आले. या चौघांवर पेठ बीड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावेळी पेठ बीड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक त्रिभुवन, पोलीस उपनिरीक्षक पठाण, पोलीस नाईक आलगट, पाईकराव, जायभाये यांनी या कारवाईमध्ये कृषी विभागाच्या पथकासोबत कारवाईत सक्रिय सहभाग घेतला होता.जिल्ह्यातील कृषी केंद्रांवर देखील या कंपनीची कीटकनाशके विक्री करु नयेत असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
१९ लाख रुपयांची बनावट कीटकनाशके जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2019 11:51 PM
शहरातील औद्योगिक वसाहतीमधील एका गोदाममाध्ये बनावट कीटकनाशके बनवण्याचे काम सुरु होते. याची माहिती गुप्त वार्ता कृषी विभागाचे जिल्हा अधीक्षक व तालुका कृषी अधिकारी यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून औद्योगिक वसाहतीमधील गोदामावर बुधवारी रात्री उशिरा छापा मारला.
ठळक मुद्देकृषी विभागाची कारवाई : पेठ बीड पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; पहाटेपर्यंत चालली कारवाई