शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
3
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
4
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
5
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
6
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
7
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
8
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
9
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
10
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
11
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
12
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
13
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
14
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
15
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
16
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
17
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
18
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न

टाकरवण आरोग्य केंद्रातील रबरी शिक्का प्रकरण; खाजगी कंपनीच्या तंत्रज्ञाची हकालपट्टी

By सोमनाथ खताळ | Published: September 07, 2022 6:40 PM

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या सुचनेनंतर तडकाफडकी कारवाई

बीड : माजलगाव तालुक्यातील टाकरवण आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी रबरी शिक्के लावून बायोमेट्रिकवर हजेरी लावल्याचा प्रकार समोर आला होता. याच प्रकरणात खाजगी कंपनीचा रक्त संकलन तंत्रज्ञाला बडतर्फ केले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सुचनेनंतर कंपनीकडून ही कारवाई करण्यात आली आहे. आता डॉक्टर, कर्मचाऱ्यांवरही कारवाईची टांगती तलवार आहे.

टाकरवण आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर नसतानाही त्यांची बायोमेट्रिक हजेरी लागली होती. ही बाब संशयास्पद आढळल्याने १ ऑगस्ट रोजी खुद्द जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गिते व माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.संजय कदम यांनी टाकरवणला भेट दिली. यावेळी डॉ.चंदाराणी नरवडे या परवानगी घेऊन गेल्या होत्या, तर डॉ.आकाश राठोड हे गैरहजर होते. याचवेळी डॉ.गिते व डॉ.कदम यांनी लिपीक, शिपाई आणि खाजगी कंपनीच्या रक्त संकलन तंत्रज्ञाची चौकशी केली असता त्यांनी काही पुरावे दिले. तसेच कबुलीही दिली. यात एक प्रयोगशाळा तंत्रज्ञही असल्याचे त्यांनी सांगितले. या सर्व प्रकारावरून डॉ.गिते यांनी कंपनीच्या जिल्हा समन्वयकांना हा प्रकार कळविला. त्यावरून जिल्हा समन्वयक राहुल तिडके यांनी तंत्रज्ञ अनिल कसपटे याला बडतर्फ केले आहे. या कारवाईने इतर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

डॉक्टर, कर्मचारीही रडारवररबरी शिक्का प्रकरणात तंत्रज्ञाच्या रूपाने पहिली विकेट गेली आहे. परंतू अद्यापही याच आरोग्य केंद्रातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांबाबतही काही पुरावे हाती लागलेले आहेत. त्याच अनुषंगाने त्यांच्यावरही कारवाई होणार असून ते सर्व रडारवर आहेत. त्यांच्या कारवाईचा प्रस्ताव तयार झाला असून लवकरच कारवाई होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टाकरवण आरोग्य केंद्रातील रक्त संकलन तंत्रज्ञ अनिल कसपटे यांच्याबद्दल जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी तक्रार केली होती. तसेच वेळेतीन अनियमितता, रोज उशिरा जाणे, रूग्णांमध्ये दुरावा निर्माण करणे आदी मुद्यांचा ठपका ठेवून टर्मिनेट केले आहे.- राहुल तिडके, जिल्हा समन्वयक, एचएलएल बीड

टॅग्स :Beedबीडdoctorडॉक्टर