शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
5
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
6
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
7
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
8
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
9
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
10
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
11
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
12
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
13
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
14
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
15
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

धावाधावा...पळापळा...भररस्त्यात रेड्यांच्या टक्करीने लोकांची धांदल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2021 6:35 PM

शहरातील बसस्थानकामागील छत्रपती शाहू महाराज मार्गावरुन शाहूनगरकडे जाणाऱ्या ऐन चौकात खासगी व्यक्तींच्या मालकीचे दोन रेडे समोरासमोर आले.

बीड: शहरातील शाहूनगर भागात ऐन चौकात दोन रेड्यांमध्ये जुंपली. तब्बल अर्धा तास ही झुंज सुरु होती. त्यामुळे वाहतूक तर ठप्प झालीच, पण धावाधावा व पळापळाच्या हाकेने बघ्यांचीही धांदल उडाली. दोन्ही रेड्यांच्या पायाला दोर बांधून त्यांना दोन वेगवेगळ्या दिशेला नेले तेव्हा ही टक्कर थांबली. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता हा प्रकार घडला.

शहरातील बसस्थानकामागील छत्रपती शाहू महाराज मार्गावरुन शाहूनगरकडे जाणाऱ्या ऐन चौकात खासगी व्यक्तींच्या मालकीचे दोन रेडे समोरासमोर आले. प्रत्यक्षदर्क्षींच्या मते त्यांनी एकमेकांकडे रोखून पाहिले व धावतच समोरासमोर आले. त्यानंतर एकमेकांना शिंगाने मारुन टक्कर सुरु झाली. दोन्ही रेड्यांची शिंगे एकमेकांत अडकल्याने त्यांच्या शरीराचा तोल जात होता. मात्र, हा तोल सांभाळत त्यांची झुंज सुरु होती. पाहता- पाहता ते अधिक आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहने खोळंबली. भररस्त्यात त्यांची ही झुंज सुरु असल्याने बघ्यांची गर्दीही वाढली. कधी रस्त्याच्या या बाजूला तर कधी त्या बाजूला असा त्यांचा मुक्त 'धिंगाणा' सुरु होता. तब्बल अर्धा तास हा सगळा प्रकार सुरु होता. त्यामुळे पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना रस्त्यात अडकून पडावे लागले.काही जणांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करुन मनोरंजन केले.

दुचाकी कोसळल्यारेड्यांच्या झुंजीदरम्यान धक्का लागून ओळीने उभ्या केलेल्या तीन दुचाकी पडल्या, त्यानंतर एक रेडा नालीत कोसळला. मात्र, त्याने वर येऊन समोरच्या रेड्यावर शिंगाने हल्ला केला. काही व्यापाऱ्रूांनी भीतीने दुकाने बंद केली.

पोलीस आले अन् गेले !या झुंजीदरम्यान शिवाजीनगर ठाण्याचे पोलीस तेथे पोहोचले. एरवी भांडणात दोन्ही गटांना शांत करणारे पोलीस रेड्यांच्या टकरीत काहीच करु शकले नाहीत. दोन्ही रेड्यांचे आक्रमक रुप पाहून पोलिसांनी जमावाला मागे सरकरण्याचा सल्ला देत तेथून निघून जाणे पसंद केले.

पायात दोर टाकून मिळवले नियंत्रणदोन्ही रेडे एकमेकांवर चवताळून पडत. शिंगे लागल्याने ते जखमी झाले व रक्त निघू लागले. काठीने मारुन, शेपटी पिरगळून रेड्यांवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न असफल झाल्याने अखर दोन्ही रेड्यांच्या पायांना दोरीने बांधून त्यांना एकमेकांपासून वेगळे केले. याउपरही एका रेड्याने पुन्हा दुसऱ्या रेड्याकडे नजर रोखून पाहत धावण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुन्हा उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकला.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीड