शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

ग्रामीण तरुणांची गर्दी आंदोलनस्थळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2018 12:16 AM

मराठा आरक्षणासाठी तसेच मेगाभरती रद्द करावी म्हणून परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे १९ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच होते. केज, गेवराईत तिसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरु होते. माजलगावात ठिय्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी कीर्तन झाले.

ठळक मुद्देपरळीत १९ वा दिवस, आष्टीत भाजप आमदाराचा ठिय्या, बीडमध्ये आज महिलांचा मोर्चा

बीड : मराठा आरक्षणासाठी तसेच मेगाभरती रद्द करावी म्हणून परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चाचे १९ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरूच होते. केज, गेवराईत तिसऱ्या दिवशी ठिय्या आंदोलन सुरु होते. माजलगावात ठिय्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी कीर्तन झाले. आष्टी येथे आ. भीमराव धोंडे यांनी मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण देण्याची मागणी करत दोन तास ठिय्या आंदोलन केले. बीडमध्ये सोमवारी मराठा महिला क्रांती मोर्चा काढण्यात येणार आहे. ७ आॅगस्टपासून पुढील आंदोलनाची दिशा ठरणार असून, विविध ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात अतिरिक्त पोलीस बळ मागविले आहे. रविवारी शहरात पथसंचलन करण्यात आले.

केजमध्ये तिस-या दिवशीही ठिय्याकेज : येथील तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या मराठा ठिय्या आंदोलनास भेट देऊन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे यांनी पाठींबा जाहीर केला आहे. मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत न पाहता आरक्षण प्रश्नावर त्वरीत तोडगा निघणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. आपल्या मागणीसाठी कोणीही आत्महत्या करू नये असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रामभाऊ गुंड, प्राचार्य प्रवीण कन्हेरे, अंकुश इंगळे, सर्जेराव करपे, विकास मिरगणे, दीपक यादव, प्रा.हनुमंत भोसले, धनंजय देशमुख, प्रा.प्रसाद महाजन, लक्ष्मण सुरशेटवार आदी उपस्थित होते.

कीर्तनातून सांगितली आरक्षणाची गरजमाजलगाव : मराठा आरक्षणासाठी येथील तहसील समोर ठिय्या आंदोलनाचा रविवारी पाचवा दिवस होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कीर्तनातून समाज प्रबोधन करून सरकारला जागे आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हभप ज्ञानेश्वर महाराज सोळंके यांनी कीर्तनातून प्रबोधन करून मराठा समाजाला आरक्षणाची गरज असल्याचे पटवून दिले.परळीत सायकल, मोटारसायकल रॅलीपरळी : येथील तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनस्थळी सहभागी आंदोलकांनी घोषणाबाजी केली. मराठा समाजातील तरूणांनी आरक्षणप्रश्नी आत्महत्या करू नये असे आवाहन राज्य समन्वयक आबासाहेब पाटील यांनी केले. ९ आॅगस्टपासून राज्यभर होणाºया ठिय्याआंदोलनात समाजातील सर्व जण सहभागी होणार आहे, विशेष म्हणजे जनावरे, बैलगाड्याही आंदोलनात असतील असे पाटील म्हणाले.

आष्टीमध्ये भाजप आमदारांचे उपोषणआष्टी : मराठा, मुस्लिम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी भाजपचे आ. भीमराव धोंडे यांनी दुपारी साडेचार ते सायंकाळी सह वाजेपर्यंत तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. महाराष्ट्रात मराठा समाजासह मुस्लिम आणि धनगर समाजालाही आरक्षण मिळणे काळाची गरज असल्याचे सांगून नसून आरक्षणाबाबत सरकार अनुकूल असल्याचे आ. धोंडे म्हणाले. यावेळी माजी आ. साहेबराव दरेकर, अशोक साळवे, वाल्मिक निकाळजे, सतीश शिंदे, संतोष चव्हाण, बाबूराव केदार, अरूण निकाळजे, संजय सानप, काकासाहेब लांबरूड, सुरेश माळी, दादासाहेब झांजे, बाबासाहेब बांगर, विष्णूपंत वायभासे, राधाकिसन ठोंबरे, उद्धव शिरसाठ, जालिंदर वांढरे, दादासाहेब जगताप, प्रदीप वायभासे, पोपट गोल्हार, छगन तरटे, सीताराम पोकळे, बबनराव सांगळे आदी सहभागी होते.

पोलिसांचा तगडा बंदोबस्तबीड : मराठा आरक्षणासाठी सध्या जिल्हाभर आंदोलने सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यादृष्टीने जिल्ह्यात जादा कुमक मागविण्यात आली आहे. यामध्ये राज्य राखीव दल (एसआरपी), शीघ्र कृती दल (आरएएफ), दंगल नियंत्रण पथक (आरसीपी) अशा विशेष पथकांचा समावेश आहे. मागील १९ दिवसांपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलने सुरू आहेत. अनेक ठिकाणी पोलिसांवर व दुकानांवर दगडफेक झाली. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेक करून नुकसान करण्यात आले. जिल्ह्यात तीन जणांनी आरक्षणासाठी जीवन संपविले. त्यानंतर अनेक भागांत तणाव निर्माण झाला होता. अद्यापही हे आंदोलन संपलेले नाही. त्यामुळे यापुढे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विशेष बंदोबस्त बीडमध्ये पाठविण्यात आला आहे. कर्तव्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्र्व ठाण्यांचे पोलीस निरीक्षक हे बंदोबस्तावर असणार आहेत.

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा