राज्य शासनाने पूर्वी केलेल्या लॉकडाऊनच्या नियमावलीत परवानाधारक मद्यविक्रीला बंदी घातली होती. दरम्यान, बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कोरोना महामारी प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात कडक निर्बंध जाहीर केले; परंतु या नवीन नियमावलीमध्ये मद्यपींसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला. या निर्णयात शासनाने परवानाधारक बीअर बार व देशी दारू दुकानांना पार्सल सुविधाद्वारे दारू विक्री करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी सकाळपासून तळीरामांनी दारू दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावल्याचे दिसून आले. यावेळी रांग सरळ करण्यासाठी मात्र पोलिसांची तारांबळ उडाली होती.
दारू खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. यात अनेक जणांना मास्क देखील नसल्याचे दिसून येत होते. यामुळे खरेदीच्या नावावर सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला असताना पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून येत होते.
===Photopath===
220421\purusttam karva_img-20210422-wa0033_14.jpg