सलग ४२ वर्षे संस्थानासाठी आयुष्य खर्ची घालत बारा वर्षांपूर्वी आबादेव महाराज यांनी आपला देह सिद्धेश्वर चरणी समर्पित केला होता. त्यांच्यापश्चात उत्तराधिकारी म्हणून महंत पदाची सूत्रे विवेकानंद शास्त्री यांच्याकडे आहेत. दरवर्षी आबादेव महाराज यांचा पुण्यतिथी कार्यक्रम दोन दिवस साजरा केला जात असे. कीर्तन, महाप्रसादासाठी हजारो भाविक समाधी दर्शनासाठी उपस्थित असायचे. मात्र, गतवर्षीप्रमाणेच याही वर्षी पुण्यतिथी कार्यक्रमाला कोरोनाचा अटकाव झाला आणि तो भक्तांशिवाय करावा लागला. सुरेश देवा कापरे यांच्या मंत्रोच्चारात समाधी अभिषेक विवेकानंद शास्त्री यांच्या हस्ते करण्यात आला. महाप्रसादाचे यजमान ज्ञानेश्वर गाडेकर यांनीही अभिषेक करून नैवेद्य समर्पित केला. यावेळी फक्त रामदास महाराज, हनुमान ढाकणे, गोविंद पाटील, लक्ष्मण थोरात, सदा माळी, तसेच संस्थानचा साधक वर्ग उपस्थित होता.
===Photopath===
270421\vijaykumar gadekar_img-20210427-wa0028_14.jpg