शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

आधुनिक विचारांचे प्रबोधनकार संत भगवान बाबा; जाणून घ्या जीवनचरित्र आणि भगवानगडाचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2022 3:12 PM

शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजीं उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना माणिकबाबांनी अनुग्रह दिला. तेव्हा माणिकबाबांनी त्यांचे नाव भगवान बाबा असे ठेवले.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव या गावात २९ जुलै १८९६ रोजी भगवान बाबांचा जन्म झाला. भगवान बाबांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे हे पाचवे अपत्य. शांत, निश्चयी असलेल्या आबाजींच्या घरात धार्मिक वातावरण होतं. त्यांचे कुटुंब नारायणगडाचे महंत माणिकबाबा यांचे उपासक होते. शेती करत भक्तीत लीन असलेल्या आबाजींना एकदा विठ्ठलदर्शन झाले. यानंतर त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले. काही दिवसांनी आबाजींना घेऊन आईवडील विजयादशमीच्या दिवशी दर्शनानिमित्त नारायण गडावर आले. तेथे माणिकबाबांकडे आबाजींनी अनुग्रह द्या, असा हट्ट धरला. शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजीं उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना माणिकबाबांनी अनुग्रह दिला. तेव्हा माणिकबाबांनी त्यांचे नाव भगवान बाबा असे ठेवले.

पुढे माणिकबाबांनी भगवानबाबांवर नारायणगडाची जबाबदारी टाकून देह त्यागला. नारायण गडावर भगवानबाबांची समर्पित भावनेने सेवा करू होती. दरम्यान, गडावरील काही लोकांना मात्र त्यांच्यावर लोभी असल्याचा आरोप केला. यामुळे दुखावलेल्या भगवानबाबांनी नारायणगड सोडला. त्यानंतर भगवानबाबांनी धौम्यगड येथे वास्तव्य केले. येथे राहून भक्तीसोबतच त्यांनी परिसरातील ग्रामस्थांचे प्रबोधन केले. धौम्य ऋषींच्या पादुकांची सेवा करत त्यांनी धौम्यगडावर भक्तीचा गड उभारण्याचे काम सुरु केले. लोक सहभागातून श्रमदानाने धौम्यगड ते पायथ्याच्या खरवंडी गावाचा रस्ता आणि गडावरील बांधकाम केले. पुढे १९५८ मध्ये गडावरील देवळात विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गडाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी, भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून येथे विठ्ठल भक्तीचा गड उभारला आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा, असे आवाहन केले. तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. जीर्णोद्धारानंतर भगवानबाबांनी गडावर दसरा मेळाव्यास सुरुवात केली.

पांढरेशुभ्र धोतर, पांढरा सदरा, पांढरा फेटा अशी साधी राहणी असलेले भगवानबाबा अत्यंत शिस्तबद्ध होते. भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा समन्वय साधला होता. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगना, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी कायम मानवतेचा पुरस्कार केला. समाजाच्या सेवेत असतानाचा १८ जानेवारी १९६५ रोजी रात्री एक वाजता वयाच्या ६९ व्या वर्षी भगवानबाबांचे देहावसान झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळला पसरली होती.

दसरा मेळाव्याची परंपरा आहे कायम गोपीनाथ मुंडे यांनी ३५ वर्षे भगवान गडावर दसरा मेळावा आयोजनाची जबाबदारी पार पाडत मेळाव्याची परंपरा सुरु ठेवली. मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली. मात्र, २०१६ मध्ये भगवान गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी हा मेळावा घेण्यास नकार दिल्याने पंकजा मुंडे यांनी भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन जनतेला संबोधित केलं. त्यानंतर पंकजा यांनी पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील भगवानबाबांच्या जन्मस्थळी २०१७ सालापासून दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. येथे भगवानबाबांचे मोठे स्मारक उभारण्यात आले आहे.

टॅग्स :SocialसामाजिकBeedबीड