भैरवनाथाचे जुने मंदिर मंदिर असून येथे दरवर्षी भव्य यात्रा भरते. यात्रेला शेजारील गावातून दरवर्षी लेझीम पथक, दिंड्या येतात. भैरवनाथाच्या कावडी, काठ्यांची मिरवणूक व घोड्याचा छबिना काढला जातो. या परिसरातील ही सर्वात मोठी यात्रा असते. परंतु कोरोनामुळे दोन वर्षांपासून ही यात्रा बंद आहे.
सध्या या मंदिरासमोर भव्य सभा मंडप व महादेव मंदिराचे लोकवर्गणीतून जवळपास ३५ ते ४० लाख रुपयांचे बांधकाम चालू असून मंदिरासाठी गावातील लोकांनी लोकवर्गणी जमा करण्यास सुरुवात केली आहे. लोकसहभागातून साकारत असलेल्या मंदिरासाठी उद्योजक पांडुरंग सोनवणे यांनी ८ लाख, दत्तात्रय खोटे यांनी २ लाख, नवनाथ भगत यांनी १ लाख ५५ हजार, ॲड. बप्पासाहेब रामदास खिल्लारे ५१ हजार, सेवानिवृत्त शिक्षक बाबासाहेब झिंजुर्के ५१ हजार, शिक्षक तुकाराम बोराडे ५१ हजार, बाबासाहेब कुलकर्णी ५० हजार ५५५ रुपये तर अंकुश खिल्लारे यांनी १ लाख रुपये फरशीसाठी देणगी दिली. तर गावातील अनेकांनी २१ हजार, ११ हजार, ५ हजार अशी लोकवर्गणी जमा करून भव्य दिव्य सभामंडप व मंदिर निर्माणाचे काम सुरू आहे. या मंदिरासमोर गावातील सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब केशव चव्हाण यांनी वैयक्तिक स्वतः ६ लाख रुपये खर्चून भव्य दिव्य आकर्षक ध्वजस्तंभ उभारला असून यामुळे मंदिराची शोभा आणखी वाढली आहे.
गावचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिराच्या भव्यदिव्य कामासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून पुढाकार घेतला असून दानशूरांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन सरपंच दत्तात्रय खोटे यांनी केले आहे.
210821\nitin kmble_img-20210821-wa0040_14.jpg