सख्ख्या बहिणीचे नाते सांभाळता येत नाही आणि मानलेल्या गुरू बहिणीला भाऊबीजेला साडी देणाऱ्यांची संख्या समाजात वाढत असल्याचे प्रतिपादन हभप पुष्पा जगताप यांनी केले आहे.
कासारी येथे ॲड. सुभाष बन व राजेंद्र बन यांनी उभारलेल्या दत्त मंदिर आवारात दत्तजयंतीनिमित्त आयोजित कीर्तन सेवेत हभप पुष्पा जगताप बोलत होते. यावेळी ॲड. राकेश हंबर्डे, ॲड. भाऊसाहेब सायंबर, तुकाराम भोसले महाराज, प्रतिभा जोगदंड, शिवदास केरुळकर, ॲड. परशुराम नरवडे, ॲड. कांतीलाल आस्वर, शेखर कुलकर्णी, सोपान जोगदंड, ॲड. सोमीनाथ तवले, राजेंद्र बन आदी उपस्थित होते.
हभप पुष्पा जगताप म्हणाल्या की, आडातच नाही तर पोहऱ्यात कोठून येणार? म्हणजे जवळ काहीही नसतानाही केवळ बडबडत आहे, असा अर्थ काढला जातो. असे काही जवळ नसणारे पण मोठेपणा सांगणारे किंवा कोरड्या गप्पा मारणारे भरपूर लोक समाजात आहेत. खरे म्हणजे आपली पात्रता नसतानाही ती योग्यता, क्षमता आपल्यात आहेच, असे भासवून बोलणे किंवा दिखावा करणे म्हणजे केवळ वेडेपणा होय, असे त्या म्हणाल्या.