आष्टी : कोरोनाच्या महामारीत जिवाची पर्वा न करता आम्ही गेल्या दोन वर्षांपासून ड्यूटी करत असून दर दोन महिन्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना पगार मिळत आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी कुटूंब उपाशी ठेवायचे का? असा सवाल केला जात आहे. जनतेची रात्रंदिवस सेवा करत असताना आरोग्य कर्मचारी मानसिक व आर्थिक तणावाखाली येत आहे. त्यामुळे दर महिन्याच्या ५ तारखेला वेतन द्यावे, अन्यथा रजेवर जाणार असा इशारा आरोग्य कर्मचाऱ्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. दोन महिन्यांपासून वेतन नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.मागील एक वर्षापासून सतत आमची अशीच परिस्थिती आहे.आम्ही सोसायटी, बँकेचे कर्ज घेतले आहेत. त्याचे हप्ते थकले आहेत. आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. यामुळे आम्ही कर्मचारी तणावाखाली आहोत, असे कर्मचाऱ्यांनी निवेदनात म्हटले आहे.
जिवाची बाजी लावणाऱ्यांना दोन महिन्यानंतर वेतन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 4:32 AM