गेवराई : शहरातील पायोनियर इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले. मागील एक वर्षापासून मुले शाळेपासून दुरावली आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले; परंतु पायोनियर इंटरनॅशनल स्कूल मात्र या परिस्थितीस अपवाद ठरत आहे. शाळेने जून महिन्यापासून सातत्याने मुलांसाठी ऑनलाइन वर्ग घेतले. त्याचबरोबर मुलांच्या सुप्तगुणांना वाव मिळण्यासाठी इतर उपक्रमदेखील वर्षभरात शाळेने राबविले. यंदा मुले शाळेत येऊ शकत नसल्यामुळे त्यांच्यासाठी शाळेने ऑनलाइन वार्षिक स्नेहसंमेलन घेतले. कर्तव्य- मेरा, तुम्हारा, हमारा ही स्नेहसंमेलनाची संकल्पना होती. मुलांनी त्यांच्या सादरीकरणातून कोरोना योद्ध्यांना मानवंदना दिली. याद्वारे मुलांनी सद्य: परिस्थितीत आपली प्रमुख जबाबदारी ही आपली व आपल्या कुटुंबाची सुरक्षा असल्याचा संदेश दिला. प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष सुतार, डॉ.अश्विनी देशमुख, नूतन हजारे, सखाराम शिंदे, गणेश तळेकर म्हणून लाभले. संस्थेचे अध्यक्ष सुरेश बोर्डे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. व्यासपीठावर संचालक किरण कुलकर्णी, प्राचार्य सुमित बोर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोनाच्या संकटामुळे शाळेने ऑनलाइन वार्षिक स्नेहसंमेलन घेत मुलांच्या कलागुणांना वाव दिल्याचे प्राचार्य बोर्डे यांनी सांगितले. सूत्रसंचालन शिक्षिका रूपाली नागरे व रोहिणी फुलझळके यांनी केले. अध्यक्षीय समारोप संस्थेचे अध्यक्ष सुरेश बोर्डे यांनी केला, कार्यक्रमाच्या शेवटी आभार शिक्षिका रिना बने यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका दीपिका पुराणिक, विराली मिसाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.
===Photopath===
190321\sakharam shinde_img-20210316-wa0034_14.jpg
===Caption===
पोदार पायोनियर स्कुलचे ऑनलाइन वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. ा