केज : येथील उपजिल्हा रुग्णालयात २५ खाटांचे डेडिकेटर कोविड हॉस्पिटल (डीसीएच) चालू करण्यात येणार असल्याने या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येणार असल्याने केज उपजिल्हा रुग्णालयातील आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यात इतर ठिकाणी केलेल्या प्रतिनियुक्त्या रद्द करण्याची मागणी केज येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांकडे केली आहे.
केज येथील उपजिल्हा रुग्णालयात २५ खाटांचे डेडिकेटर कोविड हॉस्पिटल चालू करण्यास शासनाने १४ एप्रिल रोजी परवानगी दिली आहे. त्यानुसार तयारी पूर्ण झाली आहे. या ठिकाणी कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत. सोबतच केज उपजिल्हा रुग्णालयात कोविडच्या रुग्णासोबत नॉन कोविड रुग्णांवरही उपचार करण्यात येणार असल्याने या उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची आवश्यकता आहे. त्यामुळे आठ वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती रद्द करून त्यांची नियुक्ती केजच्या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये करावी, अशी मागणी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय राऊत यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रतिनियुक्ती केलेल्यांमध्ये डॉ. एन. जी. रेंगे, डॉ. आर. बी. गीते, डॉ. व्ही. ए. चव्हाण, डॉ. काझी सना, डॉ. नम्रता राऊत, डॉ. भारत दुरगुडे, डॉ. संतोष जावळे, डॉ. हुमेरा अफरोज तसददुख सय्यद व डॉ. विजय मोराळे यांचा समावेश आहे.
२५ खाटांसाठी लागणार १०० सिलिंडर ऑक्सिजन - डॉ. राऊत
केज उपजिल्हा रुग्णालयात चालू करण्यात येणाऱ्या २५ खाटांच्या डेडिकेटर कोविड हॉस्पिटल (डीसीएच)साठी प्रती रुग्णास दहा लिटर ऑक्सिजन लागणार आहे. त्यामुळे आपण ऑक्सिजनच्या मोठ्या १०० सिलिंडरची मागणी केली आहे. हे ऑक्सिजनचे सिलिंडर उपलब्ध होताच डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच) चालू करून कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येतील, असे डॉ. संजय राऊत यांनी सांगितले.
===Photopath===
190421\deepak naikwade_img-20210419-wa0027_14.jpg