बीड : गेवराई तालुक्यात राजापूर येथील वाळू साठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी केलेल्या कारवाईत १ हजार ब्रास वाळू जप्त केली असून, पोलीस बंदोबस्तामध्ये ही वाळू १७० पेक्षा अधिक टिप्परच्या सहाय्याने बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणली जात आहे. जिल्ह्यात वाळू माफियांविरुद्ध प्रथमच अशी कारवाई झाली आहे.बुधवारी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी गेवराई तालुक्यातील राजापूर परिसरातील गट नं ७१ मधील वाळू साठ्यावर कारवाई करत १ हजार ब्रास वाळू जप्त केली आहे. त्यानंतर ते गुरुवारी पहाटेपर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते. पकडलेली वाळू भरण्यासाठी रात्री राजापूरच्या दिशेने येणारे टिप्पर व जेसीबी काही जणांनी अडवून परत पाठवले. त्यामुळे पोलीस बंदोबस्तात रात्री उशीरा टिप्पर व इतर साहित्य घटनास्थळी पोहचवण्यात आले. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत जप्त केलेल्या वाळूची वाहतूक सुरू होती. तसेच पुढील दोन ते तीन दिवस ही कारवाई चालणार आहे. जप्त केलेला सर्व वाळू साठा बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात ठेवण्यात येत असून या प्रकरणाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकारी परिसरातील वाळू साठ्याचा लिलाव करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.जिल्हाधिकाºयांनी गुरुवारी रात्री उशिरा घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच इतर ठिकाणचा वाळू साठा देखील जिल्हाधिकारी कार्यालयात पुढील दोन दिवसात आणण्याच्या संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना सूचना दिल्या.अधिकारी, कर्मचारी तळ ठोकूनगेवराई तालुक्यातील राजापूर येथील गट नंबर ७१ व ३९, गंगावाडी, काठोडा व परिसरात अनेक ठिकाणी वाळू साठे आहेत. त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे.राजापूर येथे बुधवारी कारवाईनंतर जिल्हा खनिकर्म अधिकारी आनंद पाटील, गेवराई तहसीलदार चव्हाण, पोलीस अधिकारी व माजलगाव, आष्टी तालुक्यातील मंडळ अधिकारी व तलाठी यांच्यासह इतर कर्मचारी गुरुवारी रात्री देखील घटनास्थळी तळ ठोकून होते.नागरिकांना अवैध वाळू साठा आढळून आल्यास याची माहिती देण्यासाठी जिल्हा गौण खनिज विभागातील अधिकारी व संबंधित अधिकाºयांचे संपर्क नंबर दिले जाणार आहेत.वाळू माफिया मोकाटचएवढ्या मोठ्या प्रमाणात सापडलेली वाळू नेमकी कोणाची याची चर्चा जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात होती, मात्र, अद्यापपर्यंत कोणावरही कारवाई करण्यात आलेली नाही.राजापूर परिसरातील वाळू साठ्यावरील कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर एवढ्या मोठा वाळू साठा करणारे वाळू माफिया कोण आणि त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कलेक्टर कचेरीत वाळूचा ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:26 AM
गेवराई तालुक्यात राजापूर येथील वाळू साठ्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी केलेल्या कारवाईत १ हजार ब्रास वाळू जप्त केली असून, पोलीस बंदोबस्तामध्ये ही वाळू १७० पेक्षा अधिक टिप्परच्या सहाय्याने बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आणली जात आहे.
ठळक मुद्देमहसूलच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना बजावणार नोटीस : १७० पेक्षा अधिक टिप्परने वाळूची वाहतूक