गेवराई : गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा करून बीडकडे निघालेले टिप्पर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडला. पाडळसिंगी टोलनाक्यावर सोमवारी रात्री महसूल विभागाच्या अधिकाºयांनी ही कारवाई करुन टिप्पर तहसील कार्यालयासमोर उभा करण्यात आला आहे.गेल्या अनेक महिन्यापासून गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा सुरू आहे. रात्री अवैध वाळू उपसा करणाºया वाहनावर नजर ठेवण्यासाठी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली, मंडळाधिकारी, तलाठी यांचे पथक नेमले आहे. मात्र तरीही तालुक्यातील गोदावरीच्या पात्रातून अवैध वाळू माफियांच्या माध्यमातून सुरु आहे. दरम्यान सोमवारी रात्री गोदावरीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा करून टिप्पर बीडकडे जात असल्याची माहिती महसूल विभागाच्या कर्मचाºयांना समजली असता धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी टोलनाक्यावर सदरील टिप्पर (क्र. एम. एच. १२ पीक्यू ९३९७) पकडला. टिप्पर चालकाने तेथेच वाळू खाली केली होती. ही कारवाई प्रभारी तहसीलदार अभय जोशी, मंडळाधिकारी अंगद काशीद, अमोल कुरूळकर, तलाठी, विकास ससाणे, गोविंद ढाकणेसह आदींनी केली. या टिप्परमध्ये चार ते पाच ब्रास जवळपास तीन लाख रु पयांची वाळू होती. मंडळाधिकारी अंगद काशीद यांनी पंचनामा केला.
वाळू नेणारे टिप्पर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 11:44 PM