परळी : अवैध वाहतूक करणाºया रेतीचा हायवा टिप्पर चोरून नेणाºया एकास सोमवारी येथील न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. ३० आॅगस्ट रोजी येथील तहसील कार्यालयाच्या पथकाने क्षमतेपेक्षा जास्त वाळू नेताना हायवा टिप्पर ताब्यात घेतला होता. तो तहसील कार्यालयाच्या आवारात उभा केला होता. ३ सप्टेंबर रोजी रात्री टिप्पर चोरून नेला.
याप्रकरणी मंडल अधिकारी एकनाथ शामराव गित्ते यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला होता. सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक जी.श्रीधर व अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे (अंबाजोगाई) यांनी तपासाबाबत योग्य सूचना शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देवीदास शेळके यांनी दिल्या. दरम्यान, पोलिसांनी ९ सप्टेंबर रोजी नागनाथ रामचंद्र मुंडे (२७ ह.मु कृष्णानगर परळी) यास गजाआड केले. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक वाघमारे, सपोनि श्रीकांत डोंगरे, हे.कॉं.गोविंद बडे, पो.ना. सिरसाट यांनी केली. चोरून नेलेला टिप्पर वाळूसह परळी पोलीस ठाण्यासमोर आणण्यात आला.