शिरूर कासार : श्रीक्षेत्र भगवानगडाचे संस्थापक संत भगवान बाबांचा शुक्रवारी (दि. २७) शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जन्मोत्सव श्रीक्षेत्र भगवानगडासह ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
भगवानगडाचे विद्यमान महंत डॉ. न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्री व ज्ञानेश्वरी विद्यापीठाचे प्रधान आचार्य यांनी समाधिपूजन केले. भगवानबाबांच्या संपूर्ण समाधिस्थळाला फुलांची सजावट करून त्यांनी समाधीचे दर्शन घेतले. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिरूर येथे स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी भगवानबाबांच्या मूर्तीची पूजा केली. तागडगाव येथे भगवानबाबा संस्थानावर अतुल महाराज शास्त्री यांनी बाबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक तागडगाव येथे काढली होती. याशिवाय वार्णी, भालगाव, मिडसांगवी, दत्त संस्थान अशा अनेक संस्थानांवर विविध कार्यक्रम साजरे झाले. कोरोना निर्बंध कायम असल्याने भगवानबाबांच्या शिष्यगणाकडून घरीच प्रतिमापूजन करून अभिवादन केले. राज्यभर बाबांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
280821\img-20210828-wa0001.jpg
संत भगवान बाबाचे समाधी दर्शन घेतांना डॉ नामदेव शास्त्री व प्रधान आचार्य नारायण सर्वां
स्वामी