परळी : तालुक्यातील सारडगाव येथील बहीण- भावांनी घरात राहून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध घेऊन कोरोनावर मात केली आहे, तर कुटुंबप्रमुख ज्ञानदेव तांदळे हे दवाखान्यात उपचार घेऊन बरे झाले आहेत.
परळी तालुक्यातील सारडगाव येथे तांदळे कुटुंबातील अकरा जण एकाच इमारतीत राहतात. या कुटुंबात ते स्वतः आणि अन्य दोन सदस्य कोरोनाबाधित होते. मुलगी आणि पुतण्या यांना सौम्य लक्षणे असल्याने होम क्वॉरंटाइन करण्यात आले; परंतु ज्ञानदेव तांदळेसह तीनही सदस्यांवर उपचार मात्र आवश्यक होते. कोरोनाचा अधिक त्रास होतोय, हे लक्षात येताच ज्ञानदेव तांदळे हे डॉ. सतीश गुठे, डॉ. सारिका गुठे यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. प्राथमिक तपासणी आणि कोरोना रिपोर्ट समोर ठेवत डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. सीटीस्कॅनचा स्कोअर १० असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. कुटुंबप्रमुख रुग्णालयात उपचार घेतो आणि त्याच्या घरात अन्य दोन सदस्यसुद्धा बाधित. यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यांची घालमेल झाली होती.
डॉ. गुठेंसह स्टाफने कमालीची मेहनत
घेत योग्य उपचार केेले
डॉ. गुंठे व त्यांच्या स्टाफने वेळोवेळी ऑक्सिजन लेव्हलची तपासणी, सीटीस्कॅन व योग्य औषधोपचार केल्यानेे मी सात दिवसांत कोरोनामुक्त होऊन घरी परतलो. आता आमच्या तिघांची प्रकृती चांगली आहे.
-ज्ञानदेव तांदळे, सारडगाव
घरात राहून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळच्या वेळी औषध घेतले व दररोज गुळवेल काढा व हळद पाणी पिले. नागरिकांनी कोरोनास न घाबरता काळजी घ्यावी व वेळीच उपचार घ्यावेत.
-श्वेता तांदळे, सारडगाव
फोटो :
परळी तालुक्यातील सारडगाव येथील तांदळे परिवारातील तिघांनी कोरोनावर मात केली.
===Photopath===
080521\08bed_20_08052021_14.jpg