लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीडमधून पलायन केलेल्या अल्पवयीन मुलीसह २२ वर्षीय मुलाला पुण्यात ताब्यात घेण्यात आले. १९ आॅक्टोबरला त्यांनी पलायन केले होते.गणेश रमेश हिवराळे (२२ रा.पंचशीलनगर बीड) असे पळवून नेणाऱ्या मुलाचे नाव आहे. गणेशचा यापूर्वी विवाह झालेल्या असून त्यास एक मुलगीही आहे. पीडित अल्पवयीन मुलीचा भाऊ गणेशचा मित्र आहे. यामुळे त्याचे घरी येणे-जाणे असे. यातूनच त्यांची ओळख झाली. पीडिता ही बीड शहरातील धानोरा रोडवरील शाळेत ८ वीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. शाळेत जाताना त्यांची रोज भेट होत असे. १९ तारखेला त्यांनी दुचाकीवरून पलायन केले. त्यानंतर पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. पोलीस उपनिरीक्षक बी.एस.ढगारे यांनी तात्काळ पुण्याला धाव घेत या जोडप्याला सोमवारी दुपारी एका बागेतून ताब्यात घेतले. ढगारे व कर्मचारी ए.एम.भगर हे या जोडप्याला घेऊन बीडला रवाना झाले होते.
बीडचे सैराट जोडपे पुण्यात सापडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2018 12:18 AM