लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : एखाद्या गावाचा सरपंच गावातील नागरिकांच्या आरोग्याप्रती सजग असल्यास काय होऊ शकते याचे चांगले उदाहरण अंबाजोगाई तालुक्यातील हातोला या गावचे तरुण सुशिक्षित सरपंच अॅड. जयसिंग चव्हाण यांनी सर्वांसमोर ठेवले आहे.
तालुक्यातील हातोला या गावच्या सरपंचपदी सामाजिक जाण असलेले तरुण कार्यकर्ते अॅड. जयसिंग चव्हाण यांची निवड झाली. वडिलांपासूनच राजकारण आणि समाजसेवेचा वसा लाभलेल्या अॅड. जयसिंग यांनी सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारताच गावात विकास सुरु केला. गावाच्या विकासासाठी नवेनवे प्रयोग जयसिंग यांनी सुरु केले. लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळू लागताच अॅड. जयसिंग यांनी गावातील लोकांच्या नेत्र तपासणीची मोहीम हाती घेतली.
संपूर्ण गावात यासंबंधीची जनजागृती करुन त्यांनी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख आणि नेत्र विभागप्रमुख डॉ.मनोज डोंगरे यांच्याशी संपर्कसाधून नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन हातोला येथे करण्यात आले. डॉ. मनोज डोंगरे, डॉ. एकनाथ शेळके आणि नेत्रविभागातील त्यांचा सहकारी डॉक्टरांचा ताफा आवश्यक ती यंत्रसामुग्री घेवून हातोला गावात पोहचला आणि शिबिरात त्यांनी ४५० हून अधिक रुग्णांची तपासणी केली.
या नेत्रतपासणी शिबिरात ५३ रुग्णांना विविध नेत्र आजार असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी या सर्व रुग्णांना पुढील तपासासाठी स्वाराती रुग्णालयात बोलावले. या रुग्णांची अधिक सखोल तपासणी केल्यास यासर्व रुग्णांना नवी चांगली दृष्टी मिळवून देण्यासाठी त्यांच्यावर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्याचे डॉक्टरांनी ठरविले. स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, अधीक्षक डॉ. सिध्देश्वर बिराजदार आणि नेत्रविभाग प्रमुख डॉ. मनोज डोंगरे यांनी ५३ रु ग्णांवर टप्प्या-टप्याने शस्त्रक्रि या करण्याचा निर्णय घेतला आणि अलीकडेच पहल्या टप्प्यात नेत्र विभागप्रमुख डॉ. मनोज डोंगरे, डॉ. एकनाथ शेळके यांनी या १३ रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या तर नेत्र विभागातील डॉ. हर्षल एरकाडे, डॉ. प्रियंका चिवाटे, डॉ. वर्षा राठोड, डॉ. दिव्या धोपे, डॉ. प्रदीप चांदणे, डॉ. आदित्य परमार, डॉ. स्नेहल शिंदे, डॉ. प्रांजली क्षीरसागर, डॉ.विकास डुकारे, डॉ.योगिता गायकवाड, डॉ. आशिष टेकाडे यांनी सहकार्य केले. प्रारंभी हातोल्यात शिबीर घेण्यासाठी स्वारातीचे डॉ. विनोद वेदपाठक, डॉ. अमित लोमटे, डॉ. हलगर व इतरांनी सरपंच चव्हाण यांना सहकार्य केले.स्वाराती गतवर्षी होते राज्यात दुसरेअंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागाने २०१७ च्या १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत ३,७०० नेत्र शस्त्रक्रि या करु न राज्यात दुसरा क्र मांक मिळवला होता.अंबाजोगाईच्या नेत्र विभागाने केलेल्या या उल्लेखनीय कामाची दखल राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी घेतली होती. गिरीश महाजन यांचे कार्य अधिकारी रामेश्वर नाईक यांनी या कामाचे कौतुक केले.