शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

सरपंचपद 'एससी' राखीव; परंतु गावात 'एससी' सदस्यच नाही, २ वर्षांपासून रिक्तपदाची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 18:33 IST

एससी उमेदवारांना हक्काचे सरपंच पद घेण्यापासून कोणी रोखले याचा शोध घेणे महत्वाचे आहे.

- मधुकर सिरसटकेज (बीड) : तालुक्यातील 120 ग्राम पंचायत्ती पैकी चार गावात अनुसूचित जातीसाठी सरपंचपद आरक्षित होते. परंतु या 4 गावात सन 2021 मध्ये झालेल्या ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत अनुसूचित जातीच्या सदस्यांसाठीच आरक्षण नसल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. या ग्रामपंचायत मधील सरपंचपद तब्बल दोन वर्षापासून रिक्त असून उपसरपंच हेच या ठिकाणी काम करीत आहेत.

सन 2021 मध्ये झालेल्या केज तालुक्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत आंधळ्याचिवाडी, घाटेवाडी, बोबडेवाडी आणि मुंडेवाडी या चार ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जातीसाठी सरपंचपद आरक्षित होते, असे असताना एससी सदस्य देण्यात आले नाही. एससी उमेदवारांना हक्काचे सरपंच पद घेण्यापासून कोणी रोखले याचा शोध घेणे महत्वाचे आहे.

लाखो रुपयाची बोली करून दिले संरपच पदआंधळ्याचीवाडी येथील हनुमान मंदिराच्या बांधकामासाठी जो जास्तीची रक्कम देईल त्याला सरपंच पद बहाल करण्याचा निर्णय सर्व गावकऱ्यांनी पारावर बसून घेतला. त्यासाठी बोली लावून लाखो रुपयायांची बोली लागली. नामदेव भाऊसाहेब आंधळे यांनी सर्वाधिक बोली लावल्यामुळे सर्वानुमते त्यांना उपसरपंच पद देण्यात आले. तसेच सरपंचांचा कारभार करण्याची त्यांना मुभा देण्यात आली. 25 जानेवारी 2021  रोजी आंधळ्याचीवाडी  ग्राम पंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली. केज तालुक्यात बोली लावून सरपंच, उपसरपंचांचे पदाची खिरापत  राजरोस पणे वाटप होत असताना पंचायत समितीचे अधिकारी, पदाधिकारी झोपेचे सोंग घेत आहेत.

बिडीओ राजेंद्र मोराळेनी कॉल घेतला नाहीकेजचे गटविकास अधिकारी राजेंद्र मोराळे यांच्याशी भ्रमन ध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मी घाटात प्रवासात आहे, नंतर माहिती सांगतो म्हणून त्यांनी कॉल कट केला. काही वेळानंतर पुन्हा कॉल केला असता त्यांनी कॉल घेतलाच नाही. पुन्हा गुरुवारीही कॉल केला असता हा विषय तहसील कार्यालयाचा असून माहिती घेऊन कळविण्यात येईल अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोलताना दिली.

दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा घाटेवाडी, बोबडेवाडी आणि आंधळ्यांचीवाडी या तीन ठिकाणी सहा महिने सरपंचांचे पद रिक्त राहिल्यानंतर पोटनिवडणूक व्हायला पाहिजे होती. परंतु जाणून, बुजून अनुसूचित जातीच्या नागरिकांना सरपंच पदापासून वंचित ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संगनमत करून ही माहिती वरिष्ठाना न देता दडवून ठेवल्यामुळे या प्रकरणी दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी बहुजन वंचित आघाडीचे शहर अध्यक्ष बाबासाहेब मस्के यांनी केली आहे.

एक वर्षांपूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले एक वर्षापूर्वीच आपण या प्रकरणी जिल्हाधिकारी बीड यांचेकडे मार्गदर्शन मागितले असून अद्याप त्यांचा निर्णय न आल्यामुळे पुढील कार्यवाही करण्यात आलेली नसल्याची माहिती तहदीलदार डी. सी. मेंढके यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडsarpanchसरपंचBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड