आष्टी तालुक्यातील जळगाव येथे शेतात साचलेले पाणी छायाचित्रात दिसत आहे.
कडा : शेतीची मशागत करून पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या नुकत्याच झालेल्या पावसाच्या आशेवर केल्या होत्या. पण नंतर पावसाने आखडते घेतल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असताना शेतकरी चिंतातुर झाला होता, पण तीन दिवसांपासून समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी आता समाधानी असल्याचे दिसून येत आहे.
उर्वरित शेतकऱ्यांनी खरीप पेरण्या उरकून घ्याव्यात, असे आवाहनदेखील कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
आष्टी तालुक्यात ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होते. पैकी थोड्याफार पावसावर ६० हजार हेक्टर क्षेत्रावर काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या. पण पुरेशी ओल आणि पावसाने आखडते घेतल्याने पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली असताना तीन दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसाने पिकांना तारले असल्याने आता उर्वरित राहिलेल्या २५ हेक्टर क्षेत्रावरील शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी करावी, असे आवाहनदेखील कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.
===Photopath===
280621\nitin kmble_img-20210628-wa0029_14.jpg