लोकमत न्यूज नेटवर्कबीड : साडेतीन पीठापैकी बीड जिल्ह्यात शनि महाराजांचे दीड पीठ आहे. सोमवारी शनि जन्मोत्सव बीड व राक्षसभुवन येथील शनि मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.देशातील शनि महाराजांच्या साडेतीन पीठांपैकी राक्षसभुवन येथे आद्यपीठ व बीड शहरात अर्धे पीठ अशी दोन मंदिरे आहेत. सोमवारी शनि महाराज जयंतीनिमित्त बीड येथील शनि मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच सकाळपासूनच दर्शनासाठी भक्तांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी अभिषेक, तैलाभिषेक व इतर धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी ६ वाजता शनि जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर आरती झाली.गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन येथे शनिचे आद्यपीठ आहे. या ठिकाणी शनि जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ही परंपरा हजारो वर्षांपासून आहे. यावेळी कीर्तन झाले. तसेच शनि महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
शनि महाराज जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2019 12:06 AM