लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : कोरोनामुळे सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. शाळांनी विविध ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शाळांकडून काही विशिष्ट ॲपचा वापर करण्याच्या सूचना दिल्या जातात. त्याच्या लिंकदेखील पाठविल्या जातात. या ॲप्सवर येणाऱ्या जाहिराती कधीकधी अश्लील स्वरुपाच्या असल्याने अशा ॲपचा वापर बंद करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
...
शाळांनी ही घ्यावी काळजी
गणित, विज्ञान यांसारख्या विषयांचा अभ्यास करण्यासाठी विविध प्रकारचे ॲप बाजारत आलेले आहेत. त्या ॲपवर नको त्या जाहिरातींचा भडिमार दिसून येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते. अशा ॲपच्या संदर्भातील माहिती विद्यार्थ्यांना देणे टाळले पाहिजे.
....
पालकांनीही दक्ष राहण्याची गरज
ऑनलाईन शिक्षणामुळे शाळकरी मुलांकडे पूर्णवेळ मोबाईल, लॅपटॉप आले आहेत. स्क्रीनवर केव्हा काय येईल, याची शाश्वती नाही. त्यामुळे पालकांनीदेखील दक्ष राहणे गरजेचे आहे. मुलांकडे लक्ष देऊन तो वाममार्गाला जात असले तर त्यासंदर्भात त्याला समज देणे गरजेचे आहे. तसेच मोबाईलदेखील वेळोवेळी तपासणी करणे गरजेचे आहे.
....
ऑनलाईन वर्ग सुरळीत
धुळे जिल्ह्यात प्रमुख्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून ऑनलाईन शिक्षणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. गुगल मीट, झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यात नको ते मेसेज येत नाहीत. ऑनलाईन वर्ग सुरळीत सुरू आहेत.
...
...तर तक्रार करा
विविध विषयांच्या अभ्यासाकरिता वेगवेगळ्या ॲपचा वापर केला जात आहे. त्यावर अश्लील मेसेज येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शाळा, महाविद्यालयांच्या व्हॅाट्सॲप ग्रुपवर काही विद्यार्थ्यांकडून मुद्दामहून अश्लील मेसेज किंवा व्हिडिओ टाकल्याचे प्रकार घडले आहेत. असे काही आढळल्यास सायबर सेलकडे तक्रार करावी. संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असे आवाहन सायबर सेलचे प्रमुख आर. एस. गायकवाड यांनी केले आहे.
...