बीड : कोरोनाच्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार अनुपालन करण्यासाठी जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस १६ पासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बीड जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशन संलग्न प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने घेतला आहे.कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने कोरोना व्हायरसच्या धोक्यासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत शासनाच्या निर्णयाबरोबर राहून सर्व क्लासेसला सुट्टी देण्याचे एकमताने ठरले. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कोचिंग क्लासेस संचालकांनी शासनाच्या निर्णयाचे पालन करावे. या निर्णयाची पायमल्ली करणाऱ्या क्लासेस संचालकांवर संघटनेच्या माध्यमातून आणि शिक्षण विभागाच्या माध्यमातून कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे संघटनेने सूचित केले आहे. या बैठकीस राज्याध्यक्ष प्रा. विजय पवार, जिल्हाध्यक्ष प्रा. श्रीराम चौभारे,जिल्हा उपाध्यक्ष प्रा. खांडे, जिल्हा सचिव प्रा.अर्जुन भोसले, जिल्हा कोषाध्यक्ष प्रा धांडे, शहराध्यक्ष प्रा. राम, शहर सचिव प्रा खंडागळे तसेच सर्व क्लाससेसचे संचालक उपस्थित होते. पुढील दिशा ठरवण्या साठी ३१ मार्च रोजी बैठक घेण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.महासैन्यभरतीची लेखी परीक्षा प्रक्रि या स्थगितबीड : बीड येथे सैन्यदलाच्या वतीने ४ ते १३ फेब्रुवारी २०२० या कालावधीत सैन्यभरतीमध्ये बीड, पुणे,अहमदनगर, उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील उमेदवार सहभागी झाले होते. यातील जे उमेदवार शारीरिक क्षमता आणि वैद्यकीय चाचणी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत यांच्या पुणे कार्यालय येथील लेखी परीक्षेसाठी १६ मार्च पासून प्रक्रि या सुरू होणार होती. उमेदवारास परीक्षा प्रवेश पत्र देणे तसेच पुढील लेखी परीक्षेसाठी बोलावणे याचा समावेश होता. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन ही प्रक्रि या स्थिगत करण्यात आली आहे. याबाबतच्या नवीन तारखा लवकरच कळविण्यात येतील असे पुणे भरती कार्यालयाचे कर्नल दिनानाथ सिंग यांनी कळविले.गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेशरविवारी बीड येथे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली विविध विभागांची बैठक झाली. त्यानंतर रात्री दिशानिर्देश जारी करण्यात आले. चित्रपटगृहे, सर्व जलतरण तलाव, नाट्यगृह, क्रीडा संकुल, सर्व कोचिंग क्लासेस, आठवडी तसेच जनावरांचे बाजार, पर्यटनस्थळे, उद्यान, अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक अस्थापना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अंगणवाडीत मुलांचे पोषण आहार व लसीकरण या सेवा १० मुलांच्या संख्येपर्यंत देता येणार आहेत. जि.प.चे हंगामी वसतिगृहात १० पेक्षा जास्त विद्यार्थी एका ठिकाणी बसवू नयेत. उद्योग क्षेत्रातील कामगारांकडून घरुनच काम करुन घेण्याचे आवाहन केले आहे. अंबाजोगाई स्वाराती मधील प्रथम, द्वितीय वर्षाचे वर्ग ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या आवारातच राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. पैसे काढणे व कर्ज हप्ते भरणे वगळता सर्व बँकांच्या सेवा बंद ठेवायच्या आहेत. एटीएम मशीनची स्वच्छता, प्रत्येक तासाला साबणाच्या पाण्याने व नंतर स्वच्छ पाण्याने करावी. कॅशिअरनेही स्वच्छता बाळगावी. तसेच सर्व आधार केंद्र ३१ मार्चपर्यंत बंद ठेवावेत, टपाल कार्यालयातील महत्त्वाच्या सेवा व्यतिरिक्त इतर सेवा बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिले आहेत.
ग्रामीण भागातही शाळा, कोचिंग बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 00:08 IST
कोरोनाच्या संभाव्य संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार अनुपालन करण्यासाठी जिल्ह्यातील कोचिंग क्लासेस १६ पासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय बीड जिल्हा कोचिंग क्लासेस असोसिएशन संलग्न प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने घेतला आहे.
ग्रामीण भागातही शाळा, कोचिंग बंद
ठळक मुद्देकोरोनाचे आपत्ती व्यवस्थापन : ३१ मार्चपर्यंत साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार सर्व आस्थापनांना प्रशासनाचे निर्देश