शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
Video - "मला ४० लाख..."; कर्ज फेडण्यासाठी Axis बँकेत घातला दरोडा, मॅनेजरला दिली धमकी
4
'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर
5
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
6
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
7
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
8
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
9
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
10
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
11
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
12
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
13
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
14
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
15
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
16
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
17
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
18
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
19
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 

जलयुक्त घोटाळ्याची व्याप्ती वाढली; आणखी दोन अधिकारी निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 09, 2020 5:44 PM

१६७ गुत्तेदार मजूर संस्थांवर गुन्हे दाखल, वसुलीचेही आदेश

ठळक मुद्देआतापर्यंत ३२ अधिकारी, कर्मचारी निलंबित 

बीड : जलयुक्त  शिवार  घोटाळा  प्रकरणाची व्याप्ती वाढत असून, आतापर्यंत ३२ अधिकारी कर्मचारी निलंबित झाले आहेत. १६७ गुत्तेदार मजूर संस्थांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून वसुली देखील करण्यात येणार आहे. दरम्यान, ४ डिसेंबर रोजी दोन अधिकारी पुन्हा निलंबित करण्यात आले आहेत. 

तत्कालीन अंबाजोगाई उपविभागीय कृषी अधिकारी व बीड उपविभागीय कृषी अधिकारी व्ही.एम मिसाळ व तालुका कृषी अधिकारी बी.बी बांगर यांना निलंबित करण्यात आले आहे. हे आदेश कृषी खात्याकडून देण्यात आले. 

पहिल्या टप्प्यात ४१ लाखांची वसुलीजलयुक्त शिवारची कामे तपासल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ४१ लाख रुपये वसुली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही वसुली पहिल्या टप्प्यातील असून, हा आकडा कोटीच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या पेंशन थांबवण्यात येणार आहेत. सेवानिवृत्त विभागीय संचालक व तत्कालीन  जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी यांच्यावर देखील शासनाच्या नियमानुसार कारवाई व्हावी यासाठी लढा देणार असल्याचे वसंत मुंडे यांनी सांगितले. 

राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हे दाखल करण्यास विलंबपरळी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपामुळे संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यास विलंब करण्यात आला असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे. दरम्यान सतत पाठपुरावा केल्यामुळे लाचलुचपत विभाग आर्थिक गुन्हे विभाग  विधानमंडळातील प्रश्न उत्तर महालेखा विभागामार्फत ऑडिटची मागणी केली. त्यावर शासनाने दखल घेऊन एक समिती नेमण्यात आली व त्यामध्ये तालुका कृषी अधिकारी बी.बी बांगर व ‌विभागीय कृषी अधिकारी विष्णू मिसाळ यांना ४ डिसेंबर रोजी निलंबित करण्यात आले.

८ कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीसपरळी विधानसभा मतदारसंघातील जलयुक्त शिवार  घोटाळ्यांमध्ये कृषी खात्यांमधील ३२ अधिकारी निलंबित करण्यात आले असून, १६७ गुतेदारावर, मजूर संस्थेच्या गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसे गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे नेते व चेअरमन (श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक) वसंत मुंडे यांनी तक्रार दाखल केली होती. ८८३ कामापैकी ३०७ कामे तपासणी करण्यात आली. यामध्ये ८ कोटीचा भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आला होता. उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय लोकायुक्त कार्यालयात मार्फत प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्याचा पाठपुरावा वसंत मुंडे यांनी केला. त्यानुसार ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, पुढील लढा देखील सुरू ठेवणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारBeedबीडIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प