शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

UPSC परीक्षेवर बळीराजाच्या कन्येची मोहर; घरीच अभ्यास करत पहिल्याच प्रयत्नात मिळवले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2022 3:56 PM

भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत राज्यात प्रथम तर देशात ३६ व्या क्रमांक

बीड : अल्पभूधारक शेतकऱ्याच्या कन्येने हुशारीची चुणूक दाखवत पहिल्याच प्रयत्नात देशातील सर्वात कठीण असलेल्या युपीएससी ( UPSC ) परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. श्रद्धा नवनाथ शिंदे असे या शेतकरी कन्येचे नाव आहे. भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षेत ( IES ) राज्यात प्रथम तर देशात ३६ व्या क्रमांक श्रद्धाने पटकावला आहे. श्रद्धाचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत, तर निरक्षर आई शेतीत मदत करते. 

बीड जिल्ह्याची ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळख आहे. मात्र,  जिल्ह्याची शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक, कला क्षेत्रात देखील वेगळी छाप आहे. जिल्ह्यातील लोणी शहाजानपूर येथील नवनाथ शिंदे यांच्या श्रद्धा या मुलीने अभियांत्रिकी सेवा परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याने जिल्हावासीयांचा उर अभिमानाने भरून आला आहे.  श्रद्धाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बीडमध्येच झाले. तर औरंगाबादच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. पदवी मिळताच २०१८ साली तिने थेट दिल्ली गाठत अभियांत्रिकी सेवा परीक्षेसाठी सात महिने खाजगी शिकवणी लावली. त्यानंतर जानेवारी-२०२० मध्ये झालेल्या युपीएससीची अभियांत्रिकी सेवेची परीक्षा दिली. या पहिल्याच प्रयत्नात तिला यश लाभले. श्रद्धाने राज्यात पहिला तर देशात ३६ वा क्रमांक मिळविला आहे. श्रद्धाने या यशाचे श्रेय आई - वडीलांसह गुरुजनांना दिले आहे.

मुलीच्या यशामुळे सर्वात आनंदी मुलीमुळे माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचे क्षण लाभले, अशा भावना श्रद्धाचे वडील नवनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत. मी शेती करतो. श्रद्धाला शिक्षणाची आवड होती. तिच्यात जिद्द आहे. यामुळे तिच्या शिक्षणासाठी मी काहीच कमी पडू दिले नाही. लग्नाचे वय होताच मुलीचे लग्न लावून टाका, असे इतरांनी दिलेली सल्ले न ऐकता श्रद्धाला उच्चशिक्षण दिले. तिच्या यशामुळे आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण लाभला आहे, असेही शिंदे म्हणाले. तर तिने आमचं नाव खूप मोठं केलं असून मला माझ्या मुलीचा अभिमान वाटतोय, अशा भावना श्रद्धाच्या आईने व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :Beedबीडupscकेंद्रीय लोकसेवा आयोगStudentविद्यार्थीGoverment Engineering College Aurangabadशासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद