शहरं
Join us  
Trending Stories
1
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
2
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
3
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
4
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
5
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
6
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
7
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
8
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
9
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
10
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
11
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
12
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
13
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
14
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
16
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
17
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
18
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
19
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल

हंगामीची झडती झाली, शिक्षण सचिवांना देणार अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:29 AM

हंगामी वसतिगृहांची मागील तीन दिवसांपसून राज्यस्तरीय पथकाने तपासणी पूर्ण केली असून त्याचा अहवाल दोन दिवसात महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक, शिक्षण सचिवांकडे सादर केला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात हंगामी वसतिगृहांची मागील तीन दिवसांपसून राज्यस्तरीय पथकाने तपासणी पूर्ण केली असून त्याचा अहवाल दोन दिवसात महाराष्टÑ प्राथमिक शिक्षण परिषदेचे संचालक, शिक्षण सचिवांकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर वसतिगृह योजनेच्या अंमलबजावणीत सुधारणा करण्यात येणार असून ज्या चांगल्या बाबी आहेत, त्या आणखी परिपूर्ण करण्यात येणार आहेत. राज्याचे पथक गेले असलेतरी जिल्ह्यातील पथक दरमहिन्याला अचानक पाहणी करणार असल्याचे संकेत आहे.बीड जिल्ह्यात हंगामी वसतिगृहांच्या पाहणीसाठी राज्य स्तरीय पथक आले होते. हंगामी वसतिगृह कशा रितीने चालविले जातात. तेथील व्यवस्थापन कसे आहे. नोंदणीनुसार विद्यार्थी उपस्थिती, त्यांना मिळणारे लाभ, जेवणासाठी दिल्या जाणाऱ्या खाद्य पदार्थाचा दर्जा, स्वयंपाक घर, तसेच २०१४ पासून ते २०१८ पर्यंतच्या कालावधीत योजनेची अंमलबजावणी आणि त्यासाठी आलेल्या निधीचा विनियोग कसा केला याचे लेखा व इतर बाबींची तपासणी या पथकाने केली. या चार पथकात मुंबई, नाशिक, धुळे, औरंगाबाद, जळगाव, नाशिक, यवतमाळ येथील अधिका-यांचा समावेश होता. शिक्षण सहसंचालक, लेखा लिपिक, कार्यक्रम अधिकारी, लेखाधिकारी दर्जाचे अधिकारी या पथकात होते.गुरुवारी या पथकांनी परळी, अंबाजोगाई, धारूर, आष्टी, केज तालुक्यातील वसतिगृहांची तपासणी केली. आष्टी तालुक्यात दोन पथकांनी पाहणी केली. माजलगाव तालुक्यातील वसतिगृहांच्या तपासणी वेळी पथकातील अधिका-यांनी अन्न पदार्थ खाऊन दर्जा व स्वादाची चाचणी केली.जिल्ह्यात तीन दिवसांत तपासलेल्या जवळपास ७० वसतिगृहांमध्ये अशाच प्रकारे तपासणी केली. हे पथक आता शिक्षण संचालक, शिक्षण सचिवांकडे आपला अहवाल देणार आहे. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिका-यांना या तपासणीबाबत आवश्यक ती माहिती कळविण्यात येणार आहे.तपासणीबाबत गुप्तताहंगामी वसतिगृह तपासणीसाठी आलेल्या चार पथकांसाठी पथदर्शी म्हणून शिक्षण विभागाने समन्वयक नियुक्त केले होते.पथक हंगामी वसतिगृहाच्या तपासणीला पोहोचताच हे समन्वयक तेथून लांब अंतरावर थांबत. तेथील मुख्याध्यापकांशी चर्चा आणि विचारणा पथकातील अधिकारी करत होते.पथकाने काय चौकशी केली व काय आढळले याबाबत गुप्तता राखली. त्यामुळे येणा-या अहवालावरच तपासणीचा निकाल लागणार आहे.

टॅग्स :Social welfare divisional officeसमाजकल्याण उपायुक्त कार्यालयEducation Sectorशिक्षण क्षेत्र