तीन दिवसांपूर्वी महसूल विभागाच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा एल. पी. ट्रक (एमएच. ११ ए. सी. ५५९३) पकडला होता. चालकाला पावतीची विचारणा केली असता रॉयल्टीची पावती नसल्याने महसूल पथकाने हा ट्रक तहसील कार्यालयात आणून लावला होता. या ट्रक मालकाला तहसीलदारांनी १ लाख ८६ हजार ५२८ रुपये दंडाची नोटीस बजावली होती; परंतु मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास एक इसम मद्यपान करून तहसील कार्यलयात आला. दफेदार आर. बी आम्लेकर व तहसीलदारांचे वाहनचालक शेख सत्तार या दोन कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की व मारहाण करून चावी हिसकावून वाळूचा ट्रक पळवून नेला. हा सगळा प्रकार तहसील कार्यलयाच्या सीसीटीव्हीत कैद झाला असून या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
पकडलेला वाळूचा ट्रक माफियांनी तहसीलमधून पळविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:55 AM