लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ओला व सुका कचरा वेगवेगळा करणाºयांसाठी बीड नगर परिषदेने खास आॅफर ठेवली आहे. जे लोक हा कचरा वेगवेगळा करतील त्यांना सोन्या-चांदीचे दागिने देण्यात येणार आहे. जानेवारीचा पूर्ण महिना ही आॅफर खुली राहणार असल्याचे नगर परिषदेच्या वतीने सांगण्यात आले.
रोटरी क्लब आॅफ बीड मिडटाऊन, पतंजली योग समिती व बीड नगर परिषदेच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ही आॅफर ठेवण्यात आली आहे. २९ जानेवारीपर्यंत ही आॅफर राहणार असून, प्रत्येक सात दिवसाला लकी ड्रॉ पद्धतीने एकास सोन्याची नथ व इतर दहा जणांना चांदीची नाणी बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे स्वच्छता विभाग प्रमुख व्ही.टी. तिडके यांनी सांगितले.वेगवेगळा कचरा करणा-यांसाठी कूपन पद्धत ठेवली आहे. आठवड्यातील सातही दिवस वेगवेगळा कचरा केल्यास संबंधितांना सात कूपन दिले जातील, तेच या स्पर्धेसाठी पात्र ठरतील. आठवड्याच्या शेवटी लकी ड्रॉ पद्धतीने निवड केली जाणार आहे.
स्पर्धेत सहभागी शहर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रोटरीचे अतुल संघानी, आदेश नहार, पतंजलीचे अॅड. श्रीराम लाखे, नितीन गोपन, अभिजित ठाकूर, पुरुषोत्तम एरंडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, उपाध्यक्ष हेमंत क्षीरसागर, मुख्याधिकारी डॉ. धनंजय जावळीकर आदींनी केले आहे.पहिल्या आठवड्यात १६ हजार कूपनया स्पर्धेतील पहिल्याच आठवड्यात शहरातील तब्बल १६ हजार नागरिकांनी वेगवेगळा कचरा संकलित केल्याचे कूपन पालिकेकडे जमा झाले आहेत. सोमवारी उशिरा याचा लकी ड्रॉ काढण्यात येणार असल्याचे तिडके यांनी सांगितले.