पोलिसांच्या माहितीनुसार, हरिभाऊ शंकर बुट्टे (रा.कनकसागर, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) हे व्यापारी आहेत. त्यांच्या फिर्यादीनुसार, रामराव राधाकिसन शितोळे (रा.बडाचीवाडी पोस्ट उमापूर,ता.गेवराई) हा त्यांच्याकडे नोकर म्हणून काम करत होता. २६ फेब्रुवारी रोजी हरिभाऊ व रामराव हे दोघे त्यांच्या दुचाकीवरून शहागड (जि.जालना) येथून गेवराईकडे निघाले होते. यावेळी व्यापारी हरिभाऊ बुट्टे यांनी दहा लाख रुपयांची रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवली होती. वाटेत गेवराई तालुक्यातील नागझरी शिवारातील एका हॉटेलसमोर शौचास जाण्यासाठी बुट्टे यांनी दुचाकी थांबविली. यावेळी दहा लाख रूपये त्यांनी रामराव सोबत असल्याने दुचाकीच्या डिक्कीत ठेवली, मात्र ते परतेपर्यंत रामरावने ती रक्कम घेवून पळ काढला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर बुट्टे यांनी गेवराई ठाण्यात नोकर रामराव शितोळेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि साबळे हे करत आहेत.
नोकरानेच दिला मालकाला दगा, दहा लाख पळविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 4:39 AM