शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

महामार्गालगतचा सर्व्हिस रस्ता खड्डेमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:35 AM

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातून गेलेल्या लातूर कडील महामार्गावरील सेवा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर हा सर्व्हिस रस्ता मोठ्या ...

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातून गेलेल्या लातूर कडील महामार्गावरील सेवा रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर हा सर्व्हिस रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. मुख्य रस्त्यापासून सर्व्हिस रस्त्याची उंची कमी झाली आहे. तसेच त्या बाजूने उतार झाल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना मोठे अडथळे येत आहेत. दुचाकी चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. खराब झालेला हा सर्व्हिस रस्ता दुरूस्त करावा. अशी मागणी रिपाईचे सनी वाघमारे यांनी केली आहे.

व्हॉल्व्हला गळती

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात अनेक ठिकाणी व्हॉल्व्हला गळती लागली आहे. ज्यावेळेस पाणी सोडण्यात येते. त्यावेळी या व्हॉल्व्ह मधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहन असते. एकीकडे नगरपरिषद प्रशासन पाणी बचतीचे आवाहन करीत आहे. तर दुसरीकडे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही गळती काढण्याबाबत संबंधित कंत्राटदाराला सूचना करूनही तो याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे.

शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे वाढली

अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यांवर बसस्थानकासमोर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रस्त्यांवरच ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. हे जनावरे मुख्य रस्त्यात ही आजूबाजूच्या व्यापारी संकुलात घुसून ही त्या परिसरात घाण करतात. या मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होऊ लागली आहे.

ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

अंबाजोगाई : शासकीय व निमशासकीय व सहकारी बँकांमध्ये वृद्ध, महिला, वयोवृद्ध पेन्शनर व दिव्यांग व्यक्तींना योग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीचा व अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व बँकांना व आर्थिक संस्थांना ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सोय करण्याच्या सूचना करूनही बँकांकडून याबाबत दुर्लक्ष केले जाते. परिणामी ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय वाढते.

प्लास्टिकमुळे शेतीच्या सुपिकतेला धोका

अंबाजोगाई : शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतात शेणखत टाकले जाते. परंतु या शेणखतामध्ये प्लास्टिक, काच व इतर काही वस्तू असतात. त्यामुळे शेतीच्या सुपिकतेला धोका पोहाेचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात केवळ शेणखतच टाकावे. प्लास्टिक जर येत असेल तर असे प्लास्टिक शेणखताच्या जवळ ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

रेतीचे दर वाढल्याने बांधकामात अडचणी

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात गेल्या दोन वर्षात रेतीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम करण्यास मोठ्या अडचणी येत आहेत. पंधरा ते सोळा हजार रुपयांना मिळणारी रेतीच्या गाडीसाठी आता ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूच्या किमती दुप्पटीने वाढल्याने बांधकामात मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत.

----------