लोकमत न्यूज नेटवर्कबीड : नागपूर येथील एका २७ वर्षीय महिलेला फोनवरून त्रास देणाऱ्या बीडमधील अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्याला अटक करून नागपूर पोलिसांच्या स्वाधीन केले.तब्बल अडीच महिन्यांपासून हा चोरटा या महिलेला दिवसातून २५ ते ३० वेळा कॉल करून त्रास देत होता. यासंदर्भात त्याने कबुलीही दिल्याचे सूत्रांकडून समजते. मंगळवारी दुपारी ही कारवाई केली.गणेश (एचआयव्ही असल्याचे समजल्याने नाव बदलले) असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. गणेशने आपण कॉल केल्याची कबूलीही दिल्याचे सूत्रांकडून समजते. नागपूर येथील २७ वर्षीय महिलेचा पती घरातून निघून गेला. याप्रकरणी जुलै महिन्यात कुमटी (जि.नागपूर) पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल झाली.त्यानंतर महिन्याने बीडच्या गणेशला सदरील महिलेचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्याने तिला फोन करून त्रास देण्यास सुरूवात केली. आॅगस्ट महिन्यात या महिलेने अज्ञाताविरोधात तक्रार दिली. त्यानंतरही याचा त्रास कमी झाला नाही.दिवसातून २५ ते ३० वेळा तो महिलेला संपर्क करीत असे. त्यानंतर नागपूर पोलसांनी सदरील मोबाईल क्रमांकाचा शोध घेतला असता तो बीडमधील असल्याचे समजले. त्याप्रमाणे मंगळवारी नागपूर पोलीस बीडमध्ये आले.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांची भेट घेतली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांनी या प्रकरणाची माहिती घेऊन सापळा लावला. बीड शहरातील बार्शी नाका परिसरात हा मोबाईल असल्याचे समजले. त्यांनी त्या सापळा लावून ताब्यात घेतले.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि घनश्याम पाळवदे, साजीद पठाण, सखाराम पवार, नागपूरचे ध्यानचंद दुबे, तुषार ढोबळे, पिसाळ यांनी केली. रात्री उशिरापर्यंत आरोपी बीडमध्येच होता.चेन स्नॅचिंगसह गणेशची गुन्हेगारी पार्श्वभूमी४गणेश हा अट्टल गुन्हेगार आहे. साखळी चोरणे, घरफोड्या करणे, लुटणे यासारखे गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. सध्या तो जामिनावर बाहेर असल्याचे सांगण्यात आले.
बीडच्या चोरट्याकडून नागपूर येथील महिलेचा मानसिक छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 12:04 AM
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : नागपूर येथील एका २७ वर्षीय महिलेला फोनवरून त्रास देणाऱ्या बीडमधील अट्टल गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे ...
ठळक मुद्देएलसीबीने ठोकल्या बेड्या : अडीच महिन्यांपासून फोनवर संपर्क करून देत होता त्रास