बीड: सोशल मीडियातून वादग्रस्त पोस्ट टाकणे, त्यास प्रोत्साहन म्हणून लाईक , शेअर व फॉरवर्ड करणे महागात पडू शकते. यामुळे जेलची हवा देखील खाण्याची वेळ ओढावू शकते. आक्षेपार्ह व वादग्रस्त पोस्ट केल्याची आठ महिन्यांत १४ प्रकरणे समोर आली. त्यामुळे सोशल मीडियाचा वापर जपून करणेच हिताचे आहे.
सोशल मीडियामुळे जग आणखी जवळ आले. त्यातून अनेक चांगल्या गोष्टी घडत असल्या तरी त्याचा दुरुपयोग देखील केला जाऊ शकतो. एखाद्याची प्रतिमा मलिन करण्यासाठी तसेच सामाजिक अशांतता निर्माण करण्यासाठी व अफवा पसरविण्यासाठी देखील त्याचा वापर होण्याची शक्यता असते. चालू वर्षी ऑगस्ट अखेरपर्यंत सोशल मीडियाद्वारे वादग्रस्त पोस्ट केल्याच्या १४ प्रकरणांत गुन्हे नोंद झाले आहेत.
...
सोशल मीडियाचा वापर करा सांभाळून
- साेशल मीडियाचा वापर करताना कुठलीही वादग्रस्त पोस्ट करु नका. दोन समाजात तेढ निर्माण होईल किंवा कोणाची मानहानी होईल, या हेतूने पोस्ट करणे गैर आहे. अशा शेअर, लाईक, फॉरवर्ड केल्यास संबंधितांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा लागू शकतो.
...
अशी घ्या काळजी...
१ सोशल मीडियावर खासगी माहिती, फोटो शेअर करताना काळजी घ्यावी. अनोळखी लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारु नका.
२ प्रोफाइल शक्यतो लॉक ठेवा, शिवाय तुम्ही केठे जाताय, काय करताय याचे सोशल मीडियावर सतत अपडेट देणे टाळा.
३ अपरिचित व्यक्तींशी व्हॉट्सॲपवर संवाद साधू नका तसेच व्हिडिओ कॉल करु नका. गोपनीय माहिती देणे टाळले पाहिजे.
सध्या सणाेत्सवांची रेलचेल सुरु असून
.....
सोशल मीडियावर बदनामी करणे पडू शकते महागात
सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर सामाजिक संदेशांचे आदानप्रदान करण्यासाठी करणे अपेक्षित आहे. मात्र, वैयक्तिक बदनामी करण्याच्या हेतूने अनेकदा पोस्ट केल्या जातात. यामुळे संबंधितांनी आक्षेप घेतल्यास गुन्हा नोंद होऊ शकतो. या पोस्टला प्रतिसाद देणारेही कायद्याच्या कचाट्यात सापडू शकतात.
...
मुलींनो, डीपी सांभाळा
- मुली व महिलांनी शक्यताे फेसबुकवरील प्रोफाइल लॉक करावी. व्हॉट्सॲपवर स्वत:चा फोटो डीपी म्हणून ठेवणेही धोक्याचे आहे.
- मुलींच्या फोटोचा वापर चुकीच्या पध्दतीने केला जाऊ शकतो. मॉर्बिंग करुन त्यास दुसरा फोटो जोडून अश्लीलता पसरवली जाण्याची भीती असते.
- फोटो व माहितीचा गैरवापर होऊ नये, यासाठी अनोळखी लोकांशी सोशल मीडियावर मैत्री करु नका.
...
सोशल मीडियाचा वापर जपूनच करावा. एक चूक महागात पडू शकते. त्यामुळे शक्यतो वैयक्तिक माहिती शेअर करु नका. पासवर्ड म्हणून स्वत:चा मोबाइल क्रमांक ठेवू नका. कुठलीही पोस्ट विचारपूर्वक लाईक, शेअर करा.
- आर.एस. गायकवाड, पोलीस निरीक्षक, सायबर सेल, बीड.
....