शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

पीडितेला न्याय देण्यासाठी शिरुर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 11:47 PM

दोन दिवसांपूर्वी मानूरजवळील हनुमानवाडी येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकवीस वर्षीय तरूणाने अत्याचार केला होता. पीडित बालिका उपचार घेत आहे.

ठळक मुद्देशालेय विद्यार्थी, महिला पदाधिकाऱ्यांचा मूक व निषेध मोर्चात सहभाग

शिरुर कासार : दोन दिवसांपूर्वी मानूरजवळील हनुमानवाडी येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकवीस वर्षीय तरूणाने अत्याचार केला होता. पीडित बालिका उपचार घेत आहे.त्या निंदनीय घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी व पीडितेला न्याय, आरोपीला कठोर शासन देण्यासाठी मंगळवारी बंद पाळण्यात येवून जीजामाता चौक ते पोलीस स्टेशनपर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. यात शालेय विद्यार्थिनींबरोबर महिला व लोकप्रतिनिधींसह अन्य सहभागी झाले होते. अडीच ते तीन हजार लोकांचा मूक आक्र ोश मोर्चा शांततेत पार पडला. सावधगिरी म्हणून पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. पीडित बालिकेच्या घरी जाऊन सुरेश धस यांनी धीर दिल्यानंतर ते या मोर्चात सहभागी झाले होते. मुलींच्या हस्ते पोलीस निरीक्षक सुरेश खाडे यांना निवेदन दिले. पोलीस तपासावर समाधान व्यक्त करत आता आरोपीला अटकही झाली आहे. बंद मागे घेऊन आपले व्यवहार सुरू करण्याच्या आवाहनानंतर दुकान सुरु झाले. सभापती म्हणून निवड झालेल्या उषा सरवदे यांचेसह पानसंबळ, शिरूर न.पं. अध्यक्षा मीरा गाडेकर, नगरसेविका वर्षा सानप, अश्विनी भांडेकर, आशा शिंदे, कुसुम हरिदास या व कालिका देवी महाविद्यालयाच्या प्राध्यापिका हातात निषेध फलक घेऊन सहभागी होत्या. शेवटी आ. सुरेश धस यांचेसह नगराध्यक्ष रोहिदास पाटील, दत्ता पाटील, शिवाजी पवार, उपनगराध्यक्ष प्रकाश देसरडा, ज्येष्ठ नेते दशरथ वनवे, सुरेश उगलमुगले, कल्याण तांबे, नगरसेवक दादा हरिदास, गणेश भांडेकर आदी सहभागी होते.

टॅग्स :BeedबीडRapeबलात्कारagitationआंदोलन