बीड : व्यंकट रमणा गोविंदाच्या गजरात शहरातील पेठ बीड भागातील श्री बालाजी मंदिर संस्थानतर्फे आयोजित श्री व्यंकटेश बालाजी भगवंताच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात रविवारी शेषवाहन उत्सव शोभायात्रा काढण्यात आली.९ नोव्हेंबर रोजी पुण्याह वाचनम, अंकुर अर्पणम या विधीने प्रारंभ झाला. रविवारी हवनपुजा, ध्वजारोहणम झाले. सायंकाळी कलश स्थापना, हवनपुजा झाली. रात्री शेषवाहन उत्सवाची शोभायात्रा बालाजी मंदिर, काळा हनुमान ठाणा, महावीर चौक, हिरालाल चौक, डॉ. आंबेडकर पुतळा मार्गे काढण्यात आली.सोमवारी सकाळी हंस वाहन शोभायात्रा, महाप्रसाद तर रात्री बालाजी भगवंताची गरूड वाहन शोभायात्रा काढण्यात येणार आहे.मंगळवारी बालाजी भगवंताची हनुमंत वाहन शोभायात्रा निघणार आहे. सायंकाळी ५.३० वाजता कल्याण उत्सव (बालाजी भगवंताचा शुभविवाह) सोहळा मंदिर परिसरात थाटात होणार आहे.बुधवारी हवनपुजा, तीर्थप्रसादम्, रथोत्सव (भव्य शोभायात्रा) पेठ बीड भागात निघणार आहे. रात्री अश्ववाहन शोभायात्रा व त्यानंतर महाआरती, महाप्रसादाचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून लाभ घेण्याचे आवाहन बालाजी मंदीर संस्थान, ब्रम्होत्सव आयोजन समिती आणि गोविंदा ग्रुपने केले आहे.पाच दिवस चालतो सोहळापेठ भागातील श्री बालाजी मंदीर बीड येथे होणारा ब्रम्होत्सव हा तिरूपती- तिरूमला देवस्थान सारखाच भक्तीभावाने साजरा केला जातो. ९ पासून ब्रम्होत्सवास प्रारंभ झाला. संपूर्ण विधी हे तिरूमला-तिरूपती देवस्थान वेदपाठशाळेचे उपाध्यक्ष श्रीधर स्वामी, प्रधान पुजारी रामास्वामी, उपपुजारी विष्णुस्वामी, अनिलस्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहेत. पाच दिवस या सोहळ्यानिमित्त मंदिर परिसरात भाविकांची रेलचेल असते.
‘व्यंकट रमणा गोविंदा’च्या गजरात शेषवाहन शोभायात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 12:06 AM
व्यंकट रमणा गोविंदाच्या गजरात शहरातील पेठ बीड भागातील श्री बालाजी मंदिर संस्थानतर्फे आयोजित श्री व्यंकटेश बालाजी भगवंताच्या ब्रह्मोत्सव सोहळ्यात रविवारी शेषवाहन उत्सव शोभायात्रा काढण्यात आली.
ठळक मुद्देभक्तांचा उत्साह : रविवारी सकाळी झाले हवनपूजन, ध्वजारोहणम्; तिरुमला तिरुपतीच्या ब्रह्मवृंदांची उपस्थिती