शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 12:11 AM

जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच विनाअट पीक विमा सरसकट मंजूर करावा इ. मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन : तालुक्यांमध्ये तहसील कार्यालयासमोर निदर्शने; प्रशासनास निवेदन सादर

बीड : जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी तसेच विनाअट पीक विमा सरसकट मंजूर करावा इ. मागण्यांसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी जिल्हाभरात आंदोलन करण्यात आले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, संपर्क प्रमुख आनंद जाधव यांच्या आदेशावरून जिल्हा प्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध घोेषणाबाजी करत निदर्शने झाली.आॅक्टोबरमध्ये परतीच्या तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आकडा ५०० कोटीपेक्षा जास्त आहे. अशा संकटकाळात शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून विविध मागण्यांसाठी सोमवारी हे आंदोलन करुन प्रशासनाला निवेदन ेदण्यात आले. जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, योगेश क्षीरसागर, विलास शिंदे, जि. प.सदस्य गणपत डोईफोडे, परमेश्वर सातपुते, बप्पासाहेब घुगे, संगीता चव्हाण, नितीन धांडे, चंद्रकला बांगर, बंडू पिंगळे, आशिष मस्के, गोरख सिंघन, राजेंद्र राऊत, अरुण बोंगाणे, सुनील सुरवसे सह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.गेवराईत प्रशासनाला निवेदनगेवराई : येथे माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करुन तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी रोहित पंडित, तालुका प्रमुख कालिदास नवले, दिनकर शिंदे, महादेव औटी, नंदू गाडे, महादेव खेत्रे, सतीश सपकाळ आदी उपस्थित होते.परळी तहसीलसमोर निदर्शनेपरळी : येथील तहसील कार्यालयावर निदर्शने करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख व्यंकटेश शिंदे, शहर प्रमुख राजेश विभूते, जिल्हा सहसंघटक रमेश चौंडे, युवासेना तालुका समन्वयक संतोष चौधरी, उपशहर प्रमुख मोहन राजमाने, युवा शहर अधिकारी कृष्णा सुरवसे, उपतालुका प्रमुख पप्पू नाटकर, विद्यार्थी सेना शहर संघटक गजानन कोकीळ, अश्रूबा काळे, कैलास कावरे, तुकाराम नरवाडे, अनिल शिंदे, विकास पवार, योगेश सातपुते, वैजनाथ सलगर, विष्णू सलगर, संजय सोमाणी, अक्षय राऊत शिवसैनिक सहभागी झाले होते.केजमध्ये मोर्चा निदर्शनेकेज : येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार निदर्शने झाली.आंदोलनात महिला आघाडीच्या जिल्हा सहसंपर्क प्रमुख रत्नमाला मुंडे, युवासेना तालुका प्रमुख अरविंद थोरात, शहरप्रमुख अनिल बडे, बाळू पवार, तालुका संघटक अशोक जाधव, रामहरी कोल्हे, अभिमान पटाईत, अभिमान घाटूळ, तात्या रोडे हे सहभागी झाले होते.धारुरमध्ये घोषणाबाजी, निदर्शनेधारुर : येथील तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करीत घोषणाबाजी केली. विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले. उपजिल्हाप्रमुख, शिवसेना तालुकाप्रमुख नारायण कुरुंद, शहरप्रमुख बंडू शिनगारे, माजी ता. प्रमुख विनायक ढगे, राजकुमार शेटे, माजी उपनगराध्यक्ष आनंत चिंचाळकर, नगरसेवक यशवंत गायके, बंडू बप्पा सावंत, सुनिल भांबरे, नितीन सद्दीवाल, गणेश पवार, संजय पंडित, पुरुषोत्तम सोळंके, सय्यद रियाजसह शिवसैनिक, शेतकरी आंदोलनात सहभागी होते.माजलगावात निदर्शनेमाजलगाव : येथील तहसील कार्यालयासमोर शिवसैनिकांनी निदर्शने केली. उपजिल्हाप्रमुख सुशील पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख आप्पासाहेब जाधव, सुनील खंडागळे, शहरप्रमुख पापा सोळंके, तुकाराम येवले, महिला आघाडीच्या शारदा डोईजड, सूरज गवरकर, शुभम डाके, मनोज थेटे, दिगंबर सोळंके, अभिजित कोंबडे, प्रशांत टमके हे सहभागी होते. आंदोलनानंतर तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांना निवेदन देण्यात आले.अंबाजोगाईत मोर्चाअंबाजोगाई : तालुका शिवसेनेच्या वतीने सोमवारी येथील तहसील कार्यालयावर मोर्चा निघाला. जोरदार घोषणाबाजी करीत शिवसैनिकांनी निदर्शने केली. नगर परिषदेपासून निघालेल्या मोर्चात शिवसेनेचे तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, शहरप्रमुख गजानन मुडेगावकर, बालासाहेब शेप, वैभव आजले, अशोक गाढवे, संतोष काळे, उषा यादव, विनोद पोखरकर, अभिमन्यू वैष्णव, गणेश जाधव, शिवकांत कदम, अर्जुन जाधव, दिनेश उपरे, दीपक मुळूक, नाथराव मुंडे सह शिवसैनिक सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडShiv Senaशिवसेनाagitationआंदोलन