लोकमत न्यूज नेटवर्कबीड : दुष्काळाचे संकट गंभीर आहे. घाबरु नका, खचू नका, आत्महत्या करु नका. दुष्काळाचा सामना करण्यासाठी शिवसेना तुमच्यासोबत आहे. आम्ही दुष्काळाचे राजकारण करत नाहीत, राजकारणापलिकडेही माणुसकी असते. बीड जिल्ह्यातील पशुधन वाचवण्यासाठी शंभर ट्रकच काय त्यापेक्षा जास्त चारा लागला तर उपलब्ध करून देवू. बीड जिल्ह्यातील शेतक-यांच्या जनावरांना वाचवण्यासाठी चारा कमी पडू दिला जाणार नाही असा शब्द शिवसेनेचे पक्षप्रमुुख उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना दिला.शिवसेनेच्या वतीने मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी शंभर ट्रक पशुखाद्य वाटपाचा प्रारंभ बुधवारी बीड तालुक्यातील म्हाळसजवळा येथे करण्यात आला. त्यावेळी शेतकºयांशी संवाद साधताना ठाकरे बोलत होते. प्रातिनिधिक स्वरूपात दहा शेतकºयांना पशुखाद्याचे वाटप ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर ठाकरे म्हणाले, या दुष्काळामध्ये कोरडी भाषणे करून उपयोग होणार नाही, शेतकºयांना मदतीचा हात आणि आधार दिला तरच शेतकरी उभा राहिल. सरकार फक्त घोषणांचा पाऊस पाडेल पण याने मायमाऊलींचे हंडे भरणार नाहीत अशी टीका त्यांनी केली.ते म्हणाले, आज मी येथे जे आलो आहे ते तुमच्या आशिर्वादाची परतफेड करण्यासाठी. सरकार काय करत आहे मला माहित नाही. मी मात्र अशा गंभीर परिस्थितीत तुमच्यासोबत आहे. दुष्काळाचा सामना खंबीरपणे करू, असा विश्वास देताना संधीसाधूंपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी भाषण केले. व्यासपीठावर एकनाथ शिंदे, चंद्रकांत खैरे, उपनेत्या निलम गोºहे, अर्जुन खोतकर, व जिल्हा पदाधिकारी आदी उपस्थित होते.स्वातंत्र्य सैनिकाच्या पत्नीने देऊ केलेली मदत उद्धव ठाकरे यांनी सन्मानाने केली परतगेवराईत माजी मंत्री बदामराव पंडित यांच्या निवासस्थानजवळ मैदानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पशुधनासाठीची मदत वाटप झाली. शिवसेना राबवत असलेल्या दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदत उपक्रमाला स्वातंत्र्यसैनिक कै. लक्ष्मणराव भोपळे यांच्या पत्नी विजयाताई भोपळे यांनी त्यांच्या पेन्शनमधून २१ हजार रु पयांची मदत अॅड. उज्वला भोपळे यांच्या हस्ते देऊ केली. परंतु पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी, देशासाठी बलिदान देणाºया स्वातंत्र्य सैनिकाचा शिवसेना नेहमीच सन्मान करते. जवान आणि किसान यांच्या मदतीसाठी शिवसेना सदैव तयार असते. देशासाठी बलिदान दिलेल्या सैनिकाच्या कष्टाची रक्कम शेतकºयाला देण्याऐवजी, शिवसेना शेतकºयांसाठी मदत करून, प्राण पणाला लावेल असा विश्वास देत सन्मानपूर्वक त्यांचा मदतनिधी परत केला.बीडच्या सभेमध्ये तगडा बंदोबस्तम्हाळस जवळा येथील कार्यक्रमानंतर बीड येथे सभा झाली. यावेळी सुरक्षेसाठी विशेष रक्षक तैनात होते. तर प्रवेशद्वारापासून सभास्थळ परिसरात स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त होता. यासपीठावर पर्यावरण मंत्री रामदास कदम, आरोग्य व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खा. चंद्रकांत खैरे, खा. रवींद्र गायकवाड, आमदार निलम गोºहे, विनोद घोसाळकर, अंकित प्रभू, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, कुंडलिक खांडे, माजी. आ. सुनिल धांडे, बदामराव पंडित, औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा प्रमुख विश्वनाथ स्वामी, अंबादास दानवे, राजू वैद्य, गोविंद घोळवे, बाळासाहेब पिंगळे, सुशील पिंगळे, युवासेना प्रमुख सागर बहीर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात अंजनडोह येथील बाळासाहेब सोळंके यांना व्यासपीठावर बोलावून त्यास कर्जमाफीचे पत्र मिळाले, परंतु कर्जमाफी झाली नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी निदर्शनास आणून दिले.
दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी शिवसेना शेतकऱ्यांसोबत - ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 12:42 AM
बीड जिल्ह्यातील शेतक-यांच्या जनावरांना वाचवण्यासाठी चारा कमी पडू दिला जाणार नाही असा शब्द शिवसेनेचे पक्षप्रमुुख उद्धव ठाकरे यांनी शेतक-यांना दिला.
ठळक मुद्देशेतक-यांना आवाहन : घाबरु नका, खचू नका, आत्महत्या करु नका; म्हाळस जवळा येथे शेतक-यांना पशुखाद्याचे वाटप