लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या कारर्कीदीत सर्वधर्मसमभाव दृष्टिकोन जोपासल्याचे प्रतिपादन ॲड. मनोज संकाये यांनी केले.
परळी शहरातील शिवाजी चौकात शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते. महाराजांनी आपल्या स्वराज्यात प्रत्येक जाती-धर्माच्या लोकांना सन्मानपूर्वक आणि आदराची वागणूक दिली. त्यांच्या धर्माचे रक्षण करण्याचे काम केले. प्रत्येक धर्म माणुसकी शिकवतो. मानवता हाच प्रत्येक धर्माचा पाया आहे, या विचारातून त्यांनी राज्य केले. प्रत्येक धर्म हा समानतेची शिकवण देतो म्हणून प्रत्येकानेच इतर धर्मांना तुच्छ लेखू नये, तर त्यांच्याप्रति समभाव दृष्टिकोन जोपासावा, असेही ॲड. संकाये यांनी सांगितले. या कार्यक्रमाला मुंजाभाऊ साठे, विवेक दांडगे, मुंजाभाऊ गरड, दीपक शेटे, अनिल चौधरी, सोमनाथ दौंड, मुन्ना चव्हाण, बालासाहेब गुट्टे, ज्ञानदेव आंबुरे, राम चाटे, विलास गीते, वाघा रोडे, सुंदर आव्हाड, नाना अचारे, कैलास साठे, शिवा बडे, संतोष कांबळे, संजय पाटील, दगडू भाळे, सोहेल तहीत आदींसह युवा कार्यकर्ते उपस्थित होते.