बीड : शिवसंग्रामच्या नेत्या डॉ.ज्योती विनायक मेटे यांनी बीडच्या लोकसभा निवडणूकीतून माघार घेतली आहे. त्यांनी शनिवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन हे स्पष्ट केले. याच ज्योती मेटे यांची महाविकास आघाडीकडून आणि नंतर वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणार अशी चर्चा होती.
मविआचा उमेदवार जाहिर होण्यापूर्वी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपण निवडणूक लढविणार असा दावाही केला होता. परंतू मविआने उमेदवारी नाकारली. त्यानंतर त्या शांत होत्या. अखेर त्यांनी शनिवारी आपला निर्णय जाहिर केला. तसेच आगामी काळात कोणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही, हे प्रदेश कार्यकारिणीची बैठक घेऊन ठरवू, असेही त्या म्हणाल्या.
महायुतीकडून भाजपाच्या पंकजा मुंडे, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे, वंचितकडून अशोक हिंगे हे प्रमुख उमेदवार बीड लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत.