गेवराई : राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने शुक्रवारी शहरातील शास्त्री चौकात छत्रपती अभिवादन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजक तथा माजी जि. प. अध्यक्ष विजयसिंह पंडित यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करून अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करत यावेळी शिवजन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकारी, शिवप्रेमी महिला व नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळ्याचे संस्थापक विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली समितीच्या वतीने दरवषी शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या थाटात आयोजित केला जातो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाचे आयोजन न करता फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन समारंभाचे आयोजन केले होते. शास्त्री चौकात सकाळी ११ वाजता गेवराई येथे विजयसिंह पंडित यांच्या शुभहस्ते महाआरती करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित शिवप्रेमींनी जय जिजाऊ जय शिवराय अशा घोषणा देत आसमंत दुमदुमून टाकला. शिवजन्मोत्सव सोहळा समितीने कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन केले होते. भगव्या ध्वजामुळे शास्त्री चौकात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले होते. या अभिवादन समारंभास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, सभापती जगन पाटील काळे, जयभवानी कारखान्याचे जगन्नाथ शिंदे, जालिंदर पिसाळ, नगरसेवक राधेश्याम येवले,अक्षय पवार, राष्ट्रवादी सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष किशोर कांडेकर, कार्याध्यक्ष दिनेश घोडके, सहकार्याध्यक्ष, ऋषिकेश मोटे, उपाध्यक्ष युवराज नागरे, आनंद दाभाडे, नविद फारुकी, सचिव सय्यद नौशाद, सहसचिव किरण सुतार, कोषाध्यक्ष अमित वैद्य, सहकोषाध्यक्ष विजय सुतार यांच्यासह समितीचे सर्व पदाधिकारी, शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काेरोना नियमांचे पालन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमावलीचे पालन करण्यात आले. सामाजिक अंतर राखून सर्व शिवप्रेमींनी महाराजांना अभिवादन केले. यावेळी समितीच्या वतीने उपस्थित शिवप्रेमी महिला, पुरुष नागरिक आणि पदाधिकारी यांना फेटे बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला.
===Photopath===
190221\img-20210219-wa0121_14.jpg~190221\img-20210219-wa0116_14.jpg