शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
4
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
6
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
7
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
8
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
9
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
10
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
11
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
12
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
13
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
14
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
15
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
16
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
18
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
20
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक

शिवजन्मोत्सवात ४१ सर्वधर्मीय जोडप्यांचे शुभमंगल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:07 AM

येथील शिवसेवाभावी संस्थेचे बाळासाहेब ताकट व लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बुधवारी शिवजन्मोत्सवात ४१ सर्वधर्मीय जोडप्यांचा सामुहिक विवाह संपन्न झाला.

ठळक मुद्देमाजलगावात ५०१ दाम्पत्यांच्या हस्ते शिवपूजन : शिवसेवाभावी संस्था, सोळंके सहकारी कारखान्याचा उपक्रम

माजलगाव : येथील शिवसेवाभावी संस्थेचे बाळासाहेब ताकट व लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्याच्या वतीने बुधवारी शिवजन्मोत्सवात ४१ सर्वधर्मीय जोडप्यांचा सामुहिक विवाह संपन्न झाला. यावेळी शिवजन्मोत्सवात ५०१ जोडप्यांच्या हस्ते शिवपूजन झाले.मागील सहा वर्षापासून शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधुन सर्वधर्मीय सामूहिक विवाहाचे आयोजन करण्यात येते. यापूर्वी झालेल्या सामूहिक सोहळ्यात २३४ विवाह करण्यात आले होते. व-हाडी मंडळींची जेवणाची व्यवस्था जय महेश मॉलचे शिवप्रसाद भुतडा व राम जगताप यांनी व वाटप व्यवस्था जगदीश साखरे मित्रमंडळ यांनी सांभाळली. विवाहस्थळी राजवाड्याचे भव्य स्टेज उभारण्यात आले होते. सायंकाळी पाच वाजता ढोलताशाच्या गजरात संभाजी चौकातून परन्या निघुन हनुमान मंदिरापर्यंत एकाच रंगाच्या ४१ गाडीने लग्नस्थळी आला. सर्व नवरदेव, नवरींना सारख्या रंगाचे कपडे व दीड हजार वºहाडींना भगवे फेटे बांधण्यात आले. याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन आ.प्रकाश सोळंके, बाळासाहेब ताकट, कार्यकारी संचालक एम. डी. घोरपडे, कारखान्याचे सचिव सुरेश लगड, अशोक पाटील यांनी वºहाडी मंडळीचे स्वागत केले. यावेळी बांधकाम सभापती जयसिंग सोळंके, समाज कल्याण सभापती कल्याण आबुज, आदिनाथ नवले, बाबुराव पोटभरे, चंद्रकांत शेजुळ, माहेश्वरी सभेचे जिल्हा अध्यक्ष गोविंद बजाज, सुरेश बुधवंत, जयदत्त नरवडे, शिवप्रसाद भुतडा, राम जगताप, भागवत भोसले, राहुल लंगडे आदि उपस्थित होते.तृतीयपंथियांनी वेधले लक्ष!या विवाह सोहळ्याचे आयोजक बाळासाहेब ताकट यांनी वंचित घटक म्हणून काही तृतीयपंथियांना या सोहळ्याचे नेतृत्व करण्याचा मान दिला होता. त्यानुसार प्रथमच विवाह सोहळ्यात हजेरी लावणाऱ्या तृतीय पंथियांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्यांच्या हस्ते षोडषोपचार पूजा होऊन विवाह पार पडले. यावेळी तृतीयपंथियांनी दिलेल्या सन्मानाबद्दल आयोजकांचे आभार व्यक्त केले. हा विवाह सोहळयाची लिमका बुक आॅफ रेकॉडर््ससाठी नोंद घेण्यात आले असल्याची माहिती संयोजक बाळासाहेब ताकट यांनी दिली.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम