लोकमत न्यूज नेटवर्कबीड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील शिवप्रेमी सज्ज झाले आहेत. बीडमध्ये कोल्हापूर, पुणे येथील ४०० कलाकारांचे झांजपथक आणि ढोलपथकाच्या निनादात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. मागील वर्षी पंजाब व इतर राज्यातील कलाप्रकारांची मेजवानी दिल्यानंतर यंदा सार्वजनिक उत्सव समितीने सिक्कीम, केरळ, गोवा येथील पथकांचे कलाप्रकार तसेच ‘लेझर शो’ पाहण्याची संधी उपलब्ध करुन दिल्याने बीडकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटणार आहे.१९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन शिवजन्मोत्सव सोहळा सुरु होईल. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.शिवजयंती उत्सव सोहळ्याची मुख्य मिरवणूक दुपारी २ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन राज्याचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत सुरू होईल. सायंकाळी ४ वाजता माळीवेस तर सायंकाळी ६.३० वाजता सुभाष रोड व रात्री ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सहभागी कलावंत विविध कलाप्रकार सादर करणार आहेत. शहरातील युवकांनी आपल्या शिस्तीचे प्रदर्शन करुन सहकुटूंब, सहपरिवार शिवजन्मोत्सव सोहळ्यात सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे आवाहन संदीप क्षीरसागर, अध्यक्ष प्रा. विजय पवार, सचिव सुरेश नखाते, उपाध्यक्ष फारूक पटेल, गोपाल लड्डा, डॉ. लक्ष्मीकांत बाहेगव्हाणकर, डॉ. सुनिल तिडके, डॉ. संजय जानवळे, रंजीत डिसले, अविनाश काळे, गोरख शिंदे, अॅड. हेमंत औटे, मो.लईक अहेमद, अॅड. इरफान बागवान शिवजयंतीचे माजी अध्यक्ष भरत झांबरे पाटील, माजी सभापती अमर नाईकवाडे यांनी केले.मिरवणूक मार्गावर दुचाकी अथवा वाहने आणून अडथळा करु नये असे आवाहन शिवप्रेमींनी केले असून, मिरवणुकीचा आनंद शांततेत घ्यावा, असे कळविले आहे.दरम्यान, शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व प्रमुख रस्ते भगवेमय झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा भगवे झेंडे दिसत होते, तर शेकडो शिवप्रेमींनी आपल्या दुचाकीवर भगवा झेंडा लावला होता.पोलिसांकडून तगडा बंदोबस्तकायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा पोलीस दलाच्यावतीने तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, ८ उपअधीक्षक, १७ पोलीस निरीक्षक, ३८ सहायक पोलीस निरीक्षक, ५६ पोलीस उपनिरीक्षक, १४६९ पोलीस कर्मचारी, ४ आरसीपीच्या तुकड्या, एसआरपीची एक कंपनी, ४५० होमगार्ड असा बंदोबस्त राहणार आहे.यातील काही पोलीस अधिकारी, कर्मचारी साध्या वेशात मिरवणूकीत सहभागी असतील. तसेच मिरवणूक मार्गावर देखील पोलिसांकडून चित्रीकरण केले जाणार आहे.नागरिकांनीही पोलिसांना सहकार्य करून शिवजन्मोत्सव शांततेत साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाच्यावतीने करण्यात आले आहे.रात्रीचा ‘लेझर शो’ ठरणार शहरवासियांचे विशेष आकर्षणसार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षी मुख्य मिरवणूकीत आकर्षक लेझर शोचे आयोजन केले आहे. मुख्य मिरवणूकीत रात्री ९ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ बीड शहरात प्रथमच भव्य लेझर शो दाखविण्यात येणार आहे. शहरात प्रथमच लेझर शो होत आहे.
बीडमध्ये शिवजन्मोत्सवासाठी शिवप्रेमी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 12:29 AM
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील शिवप्रेमी सज्ज झाले ...
ठळक मुद्दे४०० कलाकारांचे झांजपथक आणि ढोलपथकाच्या निनादात निघणार बीडमध्ये भव्य मिरवणूक