बीड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आता जिल्ह्यात तीन जिल्हाप्रमुख नियूक्त केले आहेत. प्रत्येकाकडे दोन मतदार संघांची जबाबदारी देण्यात आली आहे. परमेश्वर सातपुते, गणेश वरेकर आणि रत्ताकर शिंदे हे नवे जिल्हाप्रमुख असणार आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत शिवसेनेचे पूर्व व पश्चिम असे दोनच जिल्हाप्रमुख असायचे. दोघांकडे प्रत्येकी तीन मतदार संघाची जबाबदारी होती. परंतू मागील काही दिवसांपासून एक पद रिक्त होते. त्यामुळे बीडचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांच्याकडेच सर्व जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली होती. जगताप यांच्याकडून पक्ष वाढीसाठी बैठका, गाठीभेटी सुरू असतानाच शुक्रवारी नवीन जिल्हाप्रमुखांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. तसेच तीन सहसंपर्क प्रमुखही निवडले आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून या निवडी जाहिर झाल्या आहेत.
कोणाकडे कोणती जबाबदारीअनिल जगताप - सहसंपर्क प्रमुख - बीड व गेवराईबदामराव पंडित - सहसंपर्क प्रमुख गेवराई व आष्टीबाळासाहेब अंबुरे - केज व परळीगणेश वरेकर - जिल्हाप्रमुख - बीड व माजलगावपरमेश्वर सातपुते - जिल्हाप्रमुख - गेवराई व आष्टीरत्नाकर शिंदे - जिल्हाप्रमुख - केज व परळीनिजाम शेख - शहर प्रमुख - बीड